Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन बहिणींच्या छेडछाड प्रकरणी संगमनेरमध्ये एकावर गुन्हा; ‘BNS’ आणि ‘पोक्सो’ कलमान्वये कारवाई
गुन्हेगारी

दोन बहिणींच्या छेडछाड प्रकरणी संगमनेरमध्ये एकावर गुन्हा; ‘BNS’ आणि ‘पोक्सो’ कलमान्वये कारवाई

वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे फिर्यादीच्या पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी या तरुणाला रंगेहाथ पकडले. नागरिकांनी पकडल्यानंतरही त्याने 'तुमच्याकडे बघून घेतो' अशी धमकी दिली, मात्र उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दोन बहिणींच्या छेडछाड प्रकरणी संगमनेरमध्ये एकावर गुन्हा; ‘BNS’ आणि ‘पोक्सो’ कलमान्वये कारवाई

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

दोन सख्या बहिणींचा वारंवार पाठलाग करून त्यांना मैत्रीसाठी आणि मोबाईल नंबरसाठी त्रास देणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (१० मे २०२६) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला सध्या आपल्या माहेरी वास्तव्यास आहे. दि. ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची १४ वर्षीय लहान बहीण घराबाहेर फिरत असताना, दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने त्यांचा मोबाईल नंबर मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सलग काही दिवस संबंधित तरुण या दोन्ही बहिणींचा पाठलाग करत होता.

दि. ८ मे रोजी रात्री पुन्हा या तरुणाने आईस्क्रीमच्या दुकानापाशी या दोघींना अडवून मैत्री करण्याची मागणी केली आणि मोबाईल नंबरसाठी तगादा लावला. यावेळी दोन्ही बहिणींनी त्यास हटकले असता त्याने आपले नाव सौरभ पानसरे (रा. जाखुरी, ता. संगमनेर) असल्याचे सांगितले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर दि. ९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास या तरुणाने फिर्यादीच्या चुलत बहिणीमार्फत त्यांना घराबाहेर बोलावून घेतले. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे फिर्यादीच्या पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी या तरुणाला रंगेहाथ पकडले. नागरिकांनी पकडल्यानंतरही त्याने ‘तुमच्याकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली, मात्र उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणी सौरभ सुभाष पानसरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७८, ३५१(२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इमरान खान करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,673
छेडछाड पोक्सो
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ; गुन्हा दाखल

23/09/2026

आश्वी परिसरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप, कारवाईकडे लक्ष

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

By Annant Ppangarkar24/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कपाशीच्या पिकात लपवून केलेली गांजाची लागवड उघडकीस आणत पोलिसांनी २ लाख…

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.