Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

इंदुरीकर यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात सोन्याच्या चेन लांबवणाऱ्या चोरांचा पर्दाफाश, तीन सोन्याच्या चेन जप्त

07/11/2026

तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत

07/11/2026

शनिवार ०७ नोव्हेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

07/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » इंदुरीकर यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात सोन्याच्या चेन लांबवणाऱ्या चोरांचा पर्दाफाश, तीन सोन्याच्या चेन जप्त
गुन्हेगारी

इंदुरीकर यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात सोन्याच्या चेन लांबवणाऱ्या चोरांचा पर्दाफाश, तीन सोन्याच्या चेन जप्त

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सातपुते करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील गुंजाळ पाटील मळ्यात एका लग्नसमारंभादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लांबवणाऱ्या चोरांचा संगमनेर शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून तब्बल ३ तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या चेन हस्तगत केल्या आहेत.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
०३ मे २०२६ रोजी रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या दरम्यान गुंजाळ पाटील मळा, गुंजाळवाडी येथे फिर्यादी राकेश रमेश शिंदे (वय २४ वर्षे, रा. गणेशगर, गल्ली नं. १५, संगमनेर) हे आपले मित्र विश्वनाथ भागवत काळे आणि प्रसाद सदाशिव कडलग यांच्यासह इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते. सदर ठिकाणी अज्ञात इसमानी गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरून नेल्या होत्या.
या प्रकरणी राकेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ३८१/२०२६ बी.एन.एस. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस हवालदार बाबासाहेब यशवंत सातपुते आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर मच्छिंद्र नागरे यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला.
पोलिसांनी घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजचे कसून विश्लेषण केले, यामध्ये चार आरोपी निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून ३०,००० रुपये किमतीची १ तोळे वजनाची राकेश शिंदे यांची सोन्याची चेन, ४५,००० रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची विश्वनाथ काळे यांची सोन्याची चेन आणि २४,००० रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाची प्रसाद कडलग यांची सोन्याची चेन अशी एकूण तीन सोन्याची चेन हस्तगत केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या या सोन्याच्या चेन फिर्यादी व साक्षीदार यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सातपुते करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 84
क्राईम गुन्हेगारी तपास संगमनेर शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

इंदुरीकर यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात सोन्याच्या चेन लांबवणाऱ्या चोरांचा पर्दाफाश, तीन सोन्याच्या चेन जप्त

By Annant Ppangarkar07/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील गुंजाळ पाटील मळ्यात एका लग्नसमारंभादरम्यान गर्दीचा फायदा…

तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करतात… आमदार अमोल खताळांचा थेट हल्लाबोल, दिवाळीनंतर संघर्षाचे संकेत

07/11/2026

शनिवार ०७ नोव्हेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

07/11/2026

शरद पवार यांच्या प्रकृतीची बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

06/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.