Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

17/11/2026

न्यायदान प्रक्रियेला ब्रेक! संगमनेरमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू

17/11/2026

बाळासाहेब ठाकरे: काळाच्या पडद्यावर उमटलेले वादळी व्यक्तिमत्त्व!

17/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एटीएममधील चोरी टळली – आमदार सत्यजीत तांबेंच्या मार्गदर्शनाखाली रक्षक दलाची चोख कामगिरी
गुन्हेगारी

रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एटीएममधील चोरी टळली – आमदार सत्यजीत तांबेंच्या मार्गदर्शनाखाली रक्षक दलाची चोख कामगिरी

नागरिकांनी कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने रक्षक दलाशी 9067273273 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन देखील नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/05/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर नगरपरिषदेच्या रक्षक दलाने पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध करत मध्यरात्री घडलेला एटीएम तोडफोडीचा प्रकार उघडकीस आणला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या व नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रक्षक दलाच्या तातडीच्या हालचालीमुळे हा प्रकार लगेच समोर आला असून पुढील तपासाला मदत झाली आहे.

दि. 9 मे रोजी रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास रक्षक दलाची गाडी शहरात नियमित राऊंडवर होती. त्यावेळी नगरपालिका गेटसमोरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये एक संशयित व्यक्ती असल्याचा कॉल रक्षक दलाला प्राप्त झाला. विशेष म्हणजे एटीएमची लाईट बंद असल्याची शंका वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रकार संशयास्पद वाटताच रक्षक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्षक दल घटनास्थळी पोहोचले असता संबंधित व्यक्ती तेथे आढळून आली नाही. मात्र एटीएमची पाहणी केली असता मशीनच्या डिस्प्लेची तोडफोड झालेली दिसून आली. एटीएमचे काही भाग तुटून खाली पडलेले होते. त्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच रक्षक दलाने संपूर्ण परिसराची पाहणी सुरू केली.

याचवेळी एटीएमच्या 15 ते 20 फुटाच्या अंतरावर 20 वर्षांचा एक युवक बसलेला दिसून आला. संशयाच्या आधारे त्याची चौकशी करण्यात आली. मात्र “मी आत्ताच येथे आलो असून मला काहीच माहिती नाही,” असे त्याने सांगितले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून रक्षक दलाने त्याला तेथेच थांबवत तातडीने संगमनेर पोलिसांशी संपर्क साधला.

रक्षक दलाने पोलीस अधिकारी विजय माळी यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती देताच सदर बँकेच्या कर्मचारी शांता धाडगे मॅडम यांनी घटनास्थळी उपस्थित राहत एटीएम ची पाहणी केली. याबाबत पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून रक्षक दल आणि पोलीस कर्मचारी बराच वेळ घटनास्थळी तैनात होते.

अवघ्या काही दिवसांपूर्वी स्थापन झालेले संगमनेर नगरपरिषदेचे रक्षक दल शहरात नियमित गस्त घालत असून विविध घटनांमध्ये तत्परतेने कारवाई करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या दलाबद्दल विश्वास वाढत असून शहरात सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘रक्षक दल’ सतर्क –

लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीने एकहाती विजय मिळवला असून विविध विकासकामांची घौडदौड सध्या पाहायला मिळत आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले रक्षक दल शहरातील संशयास्पद हालचाली, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, चोरीचे प्रकार तसेच रात्रीच्या गस्तीसाठी सक्रियपणे काम करत आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने रक्षक दलाशी 9067273273 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन देखील नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलिसांनाही ‘रक्षक दल’ ची मोठी मदत –

शहरात रक्षक दल सक्रिय झाल्यानंतर पोलिसांवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे. अनेक घटनांमध्ये रक्षक दल प्रथम घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणत असल्याने पोलिसांना तपास आणि पुढील कारवाईसाठी मोठी मदत होत आहे. विशेषतः रात्रीच्या गस्तीमध्ये रक्षक दल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची चर्चा देखील शहरात सुरू झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 917
एटीएम फोडण्याचा प्रयत्न रक्षक दल संगमनेर नगर परिषद सतर्कता सेंट्रल बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

17/11/2026

जोर्वे येथे घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

16/11/2026

सकाळीच महिला शिक्षिकेच्या गळ्यातून दीड तोळ्याची मिनी गंठण लांबवून चोरटे पसार; संगमनेरात या रस्त्यावरील घटना

15/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

By Annant Ppangarkar17/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरात अलीकडच्या काळात वाढलेल्या घरफोड्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे…

न्यायदान प्रक्रियेला ब्रेक! संगमनेरमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू

17/11/2026

बाळासाहेब ठाकरे: काळाच्या पडद्यावर उमटलेले वादळी व्यक्तिमत्त्व!

17/11/2026

अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…

17/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.