Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; मंत्री उदय सामंत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
राजकारण

संगमनेर औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; मंत्री उदय सामंत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाहीच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या कायापालटासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक वसाहतीमधील विविध कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली असून, या प्रस्तावाला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाचे औचित साधित त्यांची भेट घेतली होती. या भेटीत आमदार खताळ यांनी वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि पथदिवे यांसारख्या गंभीर समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. वसाहतीमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव असल्याने उद्योजक व कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

विशेष म्हणजे, यासंदर्भात उद्योग केंद्र, अहिल्यानगर यांनी १० कोटी रुपयांचा प्रस्ताव यापूर्वीच तांत्रिक मान्यतेसाठी सादर केला असून, त्याला प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्यासाठी आमदार खताळ सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाहीच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. या विकासकामांना मंजुरी मिळाल्यास संगमनेर औद्योगिक वसाहत हे रोजगार निर्मितीचे एक आधुनिक आणि सुसज्ज केंद्र बनेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 541
अमोल खताळ उदय सामंत एमआयडीसी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.