Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळूमाफियांच्या विरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय; विशेष कृती दलाची स्थापना आणि माफियांसह दोषी अधिकाऱ्यांवर एमपीडीए
राजकारण

वाळूमाफियांच्या विरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय; विशेष कृती दलाची स्थापना आणि माफियांसह दोषी अधिकाऱ्यांवर एमपीडीए

नायब तहसीलदारांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत विधानसभेत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी ही माहिती दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:
राज्यातील अवैध गौण खनिज आणि वाळू उपशाच्या विरोधात राज्य सरकारने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून वाळूमाफियांना आळा घालण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली आहे. यापुढे केवळ वाळूमाफियांवरच नव्हे, तर त्यांच्याशी संगनमत करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरही थेट फौजदारी आणि कडक दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अवैध वाळू वाहतूक व उत्खनन करणाऱ्या आणि शासकीय अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘एमपीडीए’ सारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
गडचिरोली येथे अवैध गौणखनिज तस्करी करणाऱ्यांनी नायब तहसीलदारांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत विधानसभेत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात महसूल अधिकाऱ्यांना कारवाई दरम्यान मारहाण करणे, अंगावर वाहने घालणे आणि शासकीय वाहनांची तोडफोड करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
त्यातच नायब तहसीलदार गवारे यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. अशा गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून झालेली दिरंगाई अत्यंत चिंताजनक असून, एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्यासाठी तब्बल १० दिवस लावल्याचे उघड झाले आहे.
अधिकाऱ्यांच्या अशा संशयास्पद भूमिकेमुळे आणि दिरंगाईमुळे अधिकारी व तस्करांचे संगनमत स्पष्टपणे अधोरेखित होत असून, ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात हे तस्कर पाळले-पोसले जातात, त्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर आता थेट आणि कडक कारवाई केली जाईल, असा कडक इशारा महसूलमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यातील या अवैध उत्खननाला कायमचा चाप लावण्यासाठी आता संपूर्ण राज्यात गौण खनिज आणि वाळूसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग सिस्टम प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून केवळ चालू काळातीलच नाही, तर मागच्या १० वर्षांच्या कार्यकाळात राज्यात जिथे कुठे अवैध उत्खनन झाले असेल किंवा होत असेल, त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
अधिकारी आणि तस्करांमधील हे संगनमत समूळ नष्ट करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असून, अवैध गौण खनिजाचे उत्खनन रोखण्यासाठी आणि अशा प्रकरणांवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठीच स्वतंत्र कृती दलाची स्थापना केली जात असल्याचे महसूलमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 504
चंद्रशेखर बावनकुळे नियम वाळू उत्खनन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.