Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या २ लाख ६० हजारांची गोवंश जनावरांची सुटका; उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची मोठी कारवाई
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या २ लाख ६० हजारांची गोवंश जनावरांची सुटका; उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची मोठी कारवाई

कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2026Updated:15/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

कत्तलीसाठी गोवंश निर्दयतेने अन्न पाण्यावाचून बांधून ठेवणाऱ्याविरोधात संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर शहरातील मदिनानगर भागात छापा टाकून पोलिसांनी २ लाख ६० हजार रुपये किमतीची एकूण १२ गोवंश जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका केली.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना गुरुवारी (दि. १४ मे) सायंकाळच्या सुमारास एका गोपनीय बातमीदाराकडून गोवंश कत्तलीसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली होती. संगमनेर शहरातील मदिनानगर गल्ली नंबर १ मधील हावडा ब्रिज नाल्या शेजारी असलेल्या काटवनात सय्यद राजमोहंमद सय्यद आरिफ याने महाराष्ट्र राज्यात बंदी असतानाही गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवल्याचे समजले होते.

मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी डॉ. सोनवणे यांनी तात्काळ पथकाला रवाना केले. पोलीस अंमलदार बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांनी दोन पंचासह सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काटवनात चारा-पाण्याविना अत्यंत निर्दयतेने बांधलेली जिवंत जनावरे पोलिसांना आढळून आली. घटनास्थळी चौकशी केली असता, ही जनावरे मदिनानगर येथील सय्यद राजमोहंमद सय्यद आरिफ याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.

या पोलीस कारवाईत २० हजार रुपये किमतीचे १० काळ्या-पांढऱ्या रंगाचे गोवंश आणि ३० हजार रुपये किमतीची २ गोवंश जनावरे, असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ४१४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस अंमलदार बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे आणि सुनील ढाकणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 554
कत्तलखाना कारवाई गोवंश कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.