Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारी जागेवर अतिक्रमण, आता खुर्चीवरही ‘नो एन्ट्री’; सरपंच, उपसरपंच आणि तीन सदस्यांचा समावेश! संगमनेरात खळबळ
प्रशासन

सरकारी जागेवर अतिक्रमण, आता खुर्चीवरही ‘नो एन्ट्री’; सरपंच, उपसरपंच आणि तीन सदस्यांचा समावेश! संगमनेरात खळबळ

या कायदेशीर लढाईत आता नवीन वळण येण्याची शक्यता आहे, कारण अपात्र ठरवलेले सरपंच, उपसरपंच आणि तीनही सदस्य या निर्णयाविरोधात वरिष्ठ स्तरावर अपील करणार असल्याचे समजते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या गंभीर आरोपावरून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मोठा निर्णय घेत, लोकनियुक्त सरपंच आणि उपसरपंचासह एकूण पाच सदस्यांना अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे केवळ घुलेवाडीतच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, घुलेवाडी येथील सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात शिवसेनेचे शाखाप्रमुख शरद पानसरे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीकामी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

प्रशासकीय पातळीवर झालेल्या चौकशीत आणि त्यानंतर झालेल्या सुनावणीत धक्कादायक बाबी समोर आल्या. सादर करण्यात आलेला शासकीय अहवाल आणि उपलब्ध कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले की, लोकप्रतिनिधी असतानाही या सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते.

या पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सरपंच निर्मला कैलास राऊत, उपसरपंच दत्तात्रय चिमण राऊत, ग्रामपंचायत सदस्य अनिल बबन राऊत, बाजीराव लक्ष्मण पानसरे आणि सोनाली रवींद्र गिरी या पाचही जणांना दोषी धरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.

विशेष म्हणजे, निर्मला राऊत या गावच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच आहेत. एकाच वेळी पाच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने गावच्या प्रशासकीय कामावरही याचे परिणाम उमटण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निकालात या पाचही जणांचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, या निकालामुळे घुलेवाडीतील सत्ताधारी गटात चिंतेचे वातावरण असून, हा निकाल आपल्यावर अन्याय करणारा असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. या कायदेशीर लढाईत आता नवीन वळण येण्याची शक्यता आहे, कारण अपात्र ठरवलेले सरपंच, उपसरपंच आणि तीनही सदस्य या निर्णयाविरोधात वरिष्ठ स्तरावर अपील करणार असल्याचे समजते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,652
अतिक्रमण घुलेवाडी ग्रामपंचायत जिल्हाधिकारी सदस्य अपात्र सरपंच उपसरपंच अपात्र
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.