Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चार पक्ष बदलणाऱ्या खताळ यांनी आपली निष्ठा तपासावी; अजय फटांगरे यांचा घणाघात दिवटे, बालोडे, गुंजाळ यांनीही केली टीका
राजकारण

चार पक्ष बदलणाऱ्या खताळ यांनी आपली निष्ठा तपासावी; अजय फटांगरे यांचा घणाघात दिवटे, बालोडे, गुंजाळ यांनीही केली टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच संगमनेर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या एकनिष्ठेचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
अहिल्यानगर जिल्हा हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाने अनेकांना मंत्रिपदे आणि विरोधी पक्षनेते पदे देऊन मोठे केले, मात्र त्यांनीच कठीण काळात पक्षांतर करून सत्ताधारी पक्षाचा रस्ता धरला. संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी स्वतः चार पक्ष बदलून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षनिष्ठेवर बोलण्यापूर्वी स्वतः कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे. आपली राजकीय उंची किती आणि आपण कोणावर बोलतोय याचे भान त्यांनी ठेवावे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच संगमनेर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या एकनिष्ठेचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष अजय फटांगरे आणि शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रक काढून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
अजय फटांगरे म्हणाले की, रणांगणातून पळायचे नसते तर लढायचे असते, हा महाराष्ट्राचा स्वाभिमानी मंत्र आहे. मात्र, संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप आणि आता शिवसेना अशा चार पक्षांतून फिरून आले आहेत. सध्या ते शिवसेनेत असले तरी भाजपचेच काम करत आहेत. त्यांना स्वतःचा मूळ पक्ष कोणता हेच माहीत नाही. ते केवळ पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर निरर्थक वक्तव्ये करत आहेत.
केवळ फोटोबाजी आणि प्रसिद्धीचे राजकारण: सोमेश्वर दिवटे
शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी नवीन लोकप्रतिनिधींच्या कामावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत जो राजकीय अपघात झाला, ती चूक आता जनतेला कळून चुकली आहे. सध्या देशात भाजपविरोधात मोठी लाट असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन आणि बेरोजगारी यांसारख्या मुख्य मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी जाती-धर्माचे राजकारण केले जात आहे. संगमनेरचे लोकप्रतिनिधी केवळ एक फोटो काढून चार वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध करतात. त्यांनी मागील दोन वर्षांत केलेले एकतरी भरीव काम दाखवावे, असे खुले आवाहन दिवटे यांनी दिले.
संगमनेरची राजकीय संस्कृती खराब झाली: अर्चनाताई बालोडे
महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्चनाताई बालोडे यांनी स्थानिक प्रशासनावर आणि कायदा सुव्यवस्थेवर टीका केली. मागील दीड वर्षांपासून सुसंस्कृत संगमनेरमध्ये वाळू तस्करी, टक्केवारी, हप्तेखोरी आणि जाती-धर्माचे राजकारण कमालीचे वाढले आहे. ही नवी आणि बिघडलेली संस्कृती संगमनेरकरांना कधीही मान्य होणार नाही. आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांच्यावर बोलण्याइतकी समोरच्यांची राजकीय उंची नाही, असा टोला त्यांनी लगावला.
स्वतः चार पक्ष बदलणाऱ्यांनी ज्ञान शिकवू नये: निर्मलाताई गुंजाळ
महिला काँग्रेसच्या नेत्या, माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई गुंजाळ यांनी खताळ यांच्या राजकीय प्रवासावर निशाणा साधला. खताळ यांनी आधी राष्ट्रवादी, मग काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. एवढ्या कोलांटउड्या मारूनही ते आजही भाजपचेच काम करत आहेत. त्यामुळे स्वतःची निष्ठा वारंवार बदलणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या प्रामाणिकपणावर आणि निष्ठेवर बोलू नये, असा इशारा त्यांनी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,192
अजय फटांगरे अमोल खताळ अर्चना बालोडे टीका निर्मला गुंजाळ बाळासाहेब थोरात सोमेश्वर दिवटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.