Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

August 8, 2026

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९ लाख २ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

August 8, 2026

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच

August 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बनावट लग्नाचा पर्दाफाश! पोलिसांकडून ‘लुटेरी दुल्हन’सह टोळीवर गुन्हा, २.३० लाखांची मागणी करत १.६० लाखांना लुटले
गुन्हेगारी

बनावट लग्नाचा पर्दाफाश! पोलिसांकडून ‘लुटेरी दुल्हन’सह टोळीवर गुन्हा, २.३० लाखांची मागणी करत १.६० लाखांना लुटले

हा गुन्हा सुरुवातीला राहाता पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी आळेफाटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर:

लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तरुणाच्या फिर्यादीवरून ‘लुटेरी दुल्हन’सह तिच्या मावशीवर, स्थानिक महिला एजंट आणि मध्यस्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
अजय भीमराज रोहोम (वय ३१, रा. एकरुखे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) या तरुणाने या संदर्भात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल ज्ञानदेव पिंजारी (रा. श्रीरामपूर), संगीता शिंदे (रा. आळे, जुन्नर), सोनाली मोहन भोसले (रा. परतूर, जालना) आणि नवरी मुलगी राधा रमेश काळे (रा. जालना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय लग्नासाठी मुलगी पाहत असताना त्याचा मित्र अमोल पिंजारी याने आळे येथील एजंट संगीता शिंदे हिच्याशी संपर्क साधून दिला. संगीता शिंदे हिने एक मुलगी लग्नासाठी तयार असल्याचे सांगून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार २० जून २०२६ रोजी अजय व त्याचे कुटुंबीय आळे येथे आले. तेथे एजंट संगीता शिंदे आणि मुलीची मावशी बनलेली सोनाली भोसले यांनी ‘राधा काळे’ हिच्याशी अजयचे लग्न लावून दिले. या बदल्यात त्यांनी अजयकडून १ लाख ५० हजार रुपये रोख आणि १० हजार रुपये ऑनलाईन, असे एकूण १ लाख ६० हजार रुपये उकळले. लग्न झाल्यावर अजय नवरीला घेऊन आपल्या गावी परतला. त्यानंतर २१ जून रोजी दुपारी कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात या दांपत्याचे समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे पुन्हा लग्न लावून देण्यात आले.
खऱ्या थराराला सुरुवात २१ जूनच्या संध्याकाळी झाली, जेव्हा अजय कुटुंबासह घरी परतला. घराबाहेर काळ्या काचा असलेली एक पांढऱ्या रंगाची हुंदाई व्हर्ना गाडी उभी असलेली दिसली. ती गाडी पाहताच नवरी मुलगी राधा तिच्या दिशेने पळू लागली. मात्र, अजयच्या वहिनीने हटकल्यामुळे ती गाडी तेथून वेगाने पळून गेली. संशय आल्याने अजयने मित्र आणि मेव्हण्यासह त्या गाडीचा पाठलाग केला, मात्र गाडी बाभळेश्वरच्या दिशेने वेगाने निघून गेली.
घरी आल्यानंतर अजयने नवरी मुलगी राधा हिच्याकडे कडक चौकशी केली असता, तिने धक्कादायक खुलासा करत सत्य ओकले. ती गाडी तिला पळवून नेण्यासाठीच आली होती आणि तेथून पळून थेट आळेफाटा येथे जाऊन एजंट संगीता शिंदे हिच्याकडून पैशामधील स्वतःचा हिस्सा घेऊन ती घरी जाणार होती, अशी कबुली तिने दिली. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजयने तातडीने पोलीस ठाणे गाठले.
हा गुन्हा सुरुवातीला राहाता पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी आळेफाटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या टोळीने आणखी किती तरुणांना अशाच प्रकारे लुटले आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 496
गुन्हेगारी बनावट नवरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९ लाख २ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

August 8, 2026

महावितरण कर्मचाऱ्याला धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजापूरच्या प्रमोद हासेवर गुन्हा दाखल

August 6, 2026

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

By अनंत पांगारकरAugust 8, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण…

अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९ लाख २ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

August 8, 2026

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच

August 8, 2026

नाशिक-पुणे रेल्वे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीकडून तीव्र निषेध

August 8, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.