Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार २४ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

24/09/2026

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

23/09/2026

प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ; गुन्हा दाखल

23/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये नामांकित लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली वैद्यकीय व्यावसायिकाला ५.५ लाखांचा गंडा
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये नामांकित लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली वैद्यकीय व्यावसायिकाला ५.५ लाखांचा गंडा

नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/06/2026Updated:25/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
​अहिल्यानगर:
डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवून संगमनेर येथील एका ४६ वर्षीय वैद्यकीय (मेडिकल) व्यावसायिकाची ५ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
​पावबाकी रोड परिसरात राहणाऱ्या पीडित व्यावसायिकाला एका नामांकित डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी घ्यायची होती. यासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या एका जाहिरातीतील फॉर्म भरून आपली माहिती दिली. हीच माहिती सायबर चोरांच्या हाती लागली आणि फसवणुकीच्या जाळ्याला सुरुवात झाली. फॉर्म भरल्यानंतर मयांक गुप्ता, परमार आणि प्रियांका नावाच्या महिलेने पीडित व्यावसायिकाशी मोबाईलद्वारे संपर्क साधला आणि स्वतःला संबंधित कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी भासविले.
​त्यानंतर नोंदणी प्रक्रिया, फ्रँचायझी मंजुरी आणि विविध शुल्काच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांच्या भूलथापांना बळी पडून व्यावसायिकाने वेळोवेळी एकूण ५ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, पैसे भरूनही फ्रँचायझी मिळाली नाही आणि आरोपींनी अचानक संपर्क तोडून प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली.
​हा सर्व प्रकार २० मार्च २०२६ ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान घडला असून, या प्रकरणी २३ जून रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीसाठी आरोपींनी अनेक बनावट मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडींचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस निरीक्षक सागर ढिकले या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून, नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,221
अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशन ऑनलाइन फसवणूक फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ; गुन्हा दाखल

23/09/2026

आश्वी परिसरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप, कारवाईकडे लक्ष

23/09/2026

खाकीच्या आडोश्याने भलतेच उद्योग! संगमनेरात पोलीस प्रशासनाची अब्रू वेशीवर; कटकारस्थानाने संपूर्ण तालुका हादरला

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार २४ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar24/09/20260

आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी…

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

23/09/2026

प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ; गुन्हा दाखल

23/09/2026

आश्वी परिसरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप, कारवाईकडे लक्ष

23/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.