Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये स्मारकांचा मार्ग मोकळा! शिवसेनेच्या (ठाकरे) पाठपुराव्याला यश, नगरपरिषदेकडून निविदा प्रसिद्ध; उपजिल्हाप्रमुख कतारी यांनी केले स्वागत
राजकारण

संगमनेरमध्ये स्मारकांचा मार्ग मोकळा! शिवसेनेच्या (ठाकरे) पाठपुराव्याला यश, नगरपरिषदेकडून निविदा प्रसिद्ध; उपजिल्हाप्रमुख कतारी यांनी केले स्वागत

या दोन्ही भव्य स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक, सामाजिक वैभवात मोठी भर पडणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2026Updated:01/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या मागणीला अखेर मोठे यश आले आहे. नगर परिषदेकडून या ऐतिहासिक कामासाठी अधिकृत निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, संगमनेर शिवजयंती उत्सव युवक समिती आणि शहरातील शिवभक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
२६ मार्च २०२१ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने कतारी यांनी निवेदन देत यासंबंधीची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाचे तत्कालीन शहर प्रमुख सध्याचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शिवजयंती उत्सव समिती व शिवभक्तांकडून या स्मारकांसाठी सातत्याने निवेदने देऊन पाठपुरावा केला जात होता. या मागणीला आता खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर बस स्थानक आवारातील प्रस्तावित चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा १५ फूट उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा ब्राँझ गनमेटल धातूपासून उभारण्यात येणार आहे. तसेच, शिवाजी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यमान पुतळ्याच्या ठिकाणी १२ फूट उंचीचा पूर्णाकृती ब्राँझ गनमेटल पुतळा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी विशेष पुढाकार घेतला असून, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने ही अधिकृत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या दोन्ही भव्य स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक, सामाजिक वैभवात मोठी भर पडणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले. नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरप्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, पप्पू कानकाटे, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय गुंजाळ, अमोल डुकरे यांच्यासह शिवजयंती उत्सव युवक समितीचे सदस्य आणि सर्व शिवभक्तांनी उत्साहात स्वागत केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 595
अमर कतारी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा शिवसेना उद्धव ठाकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर…

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.