Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात सततच्या भीज पावसामुळे मोठे नुकसान; सावरगावतळ येथे तीन घरे कोसळली, शेती पिकेही धोक्यात
नैसर्गिक आपत्ती

संगमनेर तालुक्यात सततच्या भीज पावसामुळे मोठे नुकसान; सावरगावतळ येथे तीन घरे कोसळली, शेती पिकेही धोक्यात

यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले असून कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन

संगमनेर:

तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अखंडित भीज पावसामुळे ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सावरगावतळ येथे तर बुधवारी सकाळी तीन शेतकऱ्यांची राहती घरे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सावरगावतळ येथील वयोवृद्ध शेतकरी कारभारी दशरथ थिटमे, दादाभाऊ एकनाथ नेहे आणि भाऊसाहेब विठोबा नेहे या तिघांच्या घरांच्या भिंती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले असून कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

मात्र, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे या सर्व कुटुंबांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून, त्यांच्यासमोर आता सुरक्षित निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याही पावसाचा जोर कायम असल्याने, या घरांच्या उर्वरित भिंतीही कधीही कोसळतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेची गांभीर्य ओळखून संबंधित नागरिकांनी तातडीने गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना माहिती दिली. पोलीस पाटील नेहे यांनी तत्परता दाखवत या नुकसानीबाबत महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणजेच संगमनेर उपविभागाचे प्रांत अधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांना अवगत केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गावचे ग्राम महसूल अधिकारी महेश वाडेकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि झालेल्या नुकसानीचे रीतसर पंचनामे पूर्ण केले आहेत.

दुसरीकडे, या जोरदार भीज पाऊसामुळे परिसरातील विहिरी आता तुडुंब भरल्या असून, जमिनी मोठ्या प्रमाणावर पाणी उपळायला सुरुवात झाली आहे. सततचे ढगाळ आणि पावसाळी वातावरण, तसेच शेतात साचलेले अति पाणी व बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उभ्या शेती पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाने घरांच्या नुकसानीसोबतच शेती पिकांच्या नुकसानीचेही तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,106
भीज पाऊस नुकसान सावरगाव तळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

अतिवृष्टीचा इशारा: अकोले तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

07/07/2026

संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अवकाळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान; शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी

03/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.