Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवकाळीचा तडाखा: संगमनेर तालुक्यात ३१७७ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४५९१ शेतकऱ्यांना फटका
नैसर्गिक आपत्ती

अवकाळीचा तडाखा: संगमनेर तालुक्यात ३१७७ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४५९१ शेतकऱ्यांना फटका

या संदर्भात बोलताना तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी स्पष्ट केले की, बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील १५ गावांमधील सुमारे ४ हजार ५९१ शेतकऱ्यांना फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार ३ हजार १७७.४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे.
तालुक्यात रविवारी (२९ मार्च) आणि सोमवारी (३० मार्च) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणच्या घरांचे आणि गोठ्यांचे पत्रे उडून गेले. शेतात काढणीला आलेला गहू, कांदा, मका यासह भाजीपाला आणि डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, मंगळापूर, निमज, पेमगिरी, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, वडगाव लांडगा, राजापूर, चिखली, चिकणी आणि सायखिंडी या गावांना या पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.
नुकसानीच्या आकडेवारीनुसार, रविवारी झालेल्या पावसामुळे १००६.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात २ हजार ४८५ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यानंतर सोमवारी पुन्हा झालेल्या पावसाने अधिक हानी केली असून, २ हजार १७०.९६ हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल झाली आहेत. यात २ हजार १०६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे दोन दिवसांच्या पावसाने एकूण ३ हजार १७७.४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील पठार भागात गारपिटीने नुकसान केले होते आणि आता पुन्हा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून हा प्राथमिक अहवाल लवकरच महसूल विभागाला सादर केला जाणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.
या संदर्भात बोलताना तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी स्पष्ट केले की, बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 461
अवकाळी पाऊस नुकसान शेती पिक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

संगमनेर तालुक्यात सततच्या भीज पावसामुळे मोठे नुकसान; सावरगावतळ येथे तीन घरे कोसळली, शेती पिकेही धोक्यात

08/07/2026

अतिवृष्टीचा इशारा: अकोले तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

07/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.