Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अवकाळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान; शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी
नैसर्गिक आपत्ती

संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अवकाळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान; शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी

या गंभीर विषयाची दखल घेत त्वरित मदत मिळावी, यासाठी वीट उत्पादक संघ संगमनेर-अकोलेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे, तसेच राजू जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, अनिल जोर्वेकर, दिगंबर जोर्वेकर आणि विशाल सोनवणे यांच्यासह सर्व वीट उत्पादकांनी शासनाकडे साकडे घातले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांवर सध्या दुहेरी संकट ओढवले असून, माती, राख, कोळसा आणि भुसा यांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे हा व्यवसाय आधीच आर्थिक तोट्यात गेला आहे. तर दुसरीकडे ऐन हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने भट्टीधारकांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या परिस्थितीत शासनाने तातडीने नुकसानग्रस्त वीटभट्ट्यांचे पंचनामे करून व्यावसायिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादक संघ, संगमनेर-अकोले यांच्या वतीने करण्यात आली आहे.
वीटभट्टी व्यवसायाला अद्याप कोणतीही विमा योजना लागू नाही. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा करूनही अद्याप कोणत्याही सरकारने या मागणीची दखल घेतलेली नाही. विमा कंपन्यांकडे दाद मागितली असता, त्यांनीही हा विषय शासनाच्या अखत्यारीत असल्याचे सांगून हात झटकले आहेत.
वीटभट्टी व्यावसायिकांना शेतीप्रमाणेच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळणे आवश्यक आहे, मात्र शासन आणि विमा कंपन्या एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, कुंभार समाजाला मातीवरील ५०० ब्रासपर्यंतची रॉयल्टी माफ असताना, संगमनेरातील वीटभट्टी व्यावसायिकांकडून दरवर्षी १०० ब्रासची रॉयल्टी जबरदस्तीने वसूल केली जाते. शासनाला नियमित कर आणि रॉयल्टी भरूनही, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचारी पंचनामे करण्याची साधी तसदीही घेत नाहीत. ही अन्यायकारक परिस्थिती असल्याने, शासनाने आतातरी याकडे गांभीर्याने पहावे आणि वीट व्यवसायासाठी विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या गंभीर विषयाची दखल घेत त्वरित मदत मिळावी, यासाठी वीट उत्पादक संघ संगमनेर-अकोलेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे, तसेच राजू जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, अनिल जोर्वेकर, दिगंबर जोर्वेकर आणि विशाल सोनवणे यांच्यासह सर्व वीट उत्पादकांनी शासनाकडे साकडे घातले आहे.
या निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संगमनेरचे आमदार अमोल खताळ, प्रांत अधिकारी अरुण उंडे आणि संगमनेर-अकोलेचे तहसीलदार यांनाही पाठवण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 630
कैलास वाकचौरे मदत विमा वीट व्यावसायिक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.