Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा: आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला आदेश
नैसर्गिक आपत्ती

नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा: आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला आदेश

उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, राजेश गुंजाळ यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी सकाळी धांदरफळ, डेरेवाडी, निमज यांसह विविध गावांतील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेल्या या भागातील महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असे स्पष्ट निर्देश आमदार खताळ यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांमध्ये गारपिटीने गहू, कांदा, टोमॅटो, मका आणि डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिके जमिनीदोस्त झाली आहेत.
धांदरफळ बुद्रुक अंतर्गत येणाऱ्या डेरेवाडी येथील संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने आदिती संजय साबळे ही मुलगी जखमी झाली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भास्कर आल्हाट यांच्या घराचे पत्रे उडाल्याची आणि वर्षा भीमराज गोर्डे यांचे घर कोसळल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच निमज येथील महानुभाव पंथाच्या आश्रमावरील पत्रेही वादळी वाऱ्याने उडून गेले आहेत.
पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार खताळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यामध्ये धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेचे, भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाचे, तर निमज येथील कृषीभूषण तुकाराम गुंजाळ यांच्या डाळिंब बागेसह श्यामराव किसन कासार यांच्या गव्हाच्या पिकाचे झालेले नुकसान त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.
या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, राजेश गुंजाळ यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 472
अमोल खताळ अवकाळी पाऊस नुकसान पाहणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.