Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

24/09/2026

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच
आंदोलन

हक्काच्या रेल्वेसाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार; नाशिक – पुणे रेल्वेसाठी चक्काजाम होणारच

हिवरगाव पावसासह सिन्नर येथील समृद्धी महामार्ग, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेड आणि चाकण येथेही एकाच वेळी नऊ वाजता रास्ता रोको केला जाणार असून, भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा कणा ठरणाऱ्या नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी क्रांतीदिनी हजारो नागरिक रस्त्यावर उतरणार असून नाशिक-पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर सकाळी नऊ वाजता तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
संगमनेर, सिन्नर, अकोले, नारायणगाव, जुन्नर, मंचर, खेड आणि चाकण या संपूर्ण पट्ट्यातील जनतेच्या हक्काच्या या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नागरिक, युवक आणि महिला या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहेत.
नाशिक-पुणे-मुंबई या गोल्डन ट्रँगलच्या विकासासाठी नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी १९९८ पासून या थेट रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून ते केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महारेलपर्यंत केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न अंतिम टप्प्यात आला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेर तालुक्यातील २६ गावांमधील २८५ हेक्टर भूसंपादन पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सुमारे ६८४ कोटी रुपयांचा मोबदलाही वाटप करण्यात आला होता. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर या थेट रेल्वेचा मार्ग बदलण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हा अन्याय दूर करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व लोकप्रतिनिधींची मोट बांधली असून बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारकडे तर आमदार तांबे यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता ही लढाई जनतेच्या न्यायालयात नेण्यासाठी क्रांतीदिनाचे औचित्य साधून संपूर्ण परिसरात मोठी जनजागृती करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली नागरिक एकत्र येणार आहेत. या आंदोलनाला पद्मश्री रघुवीर खेडकर आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यासह कला, क्रीडा, शिक्षण व व्यापार क्षेत्रातील मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.
हिवरगाव पावसासह सिन्नर येथील समृद्धी महामार्ग, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेड आणि चाकण येथेही एकाच वेळी नऊ वाजता रास्ता रोको केला जाणार असून, भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 445
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

By Annant Ppangarkar24/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पावसाच्या खंडामुळे संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासन पूर्णपणे खंबीर…

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.