Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

24/09/2026

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
आंदोलन

आमदारकी पणाला लावण्यापासून आमरण उपोषणापर्यंतचा प्रवास; पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर आमदारांची भूमिका बदलती राहिल्याचा कृती समितीच्या आरोप! चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ४० वर्षांच्या कार्यकाळावर आमदार खताळ यांनी नेहमीच प्रश्न उपस्थित केले होते. यावर बोलताना कृती समितीने स्पष्ट केले की, बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्रत्यक्ष पुढे नेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/08/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाच्या मागणीसाठी पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने आज रविवारी ऐतिहासिक चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शविल्याने या प्रश्नाला एक नवे वळण मिळाले आहे. कृती समितीने आमदार खताळ यांच्या बदलत्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, त्यांना केवळ घोषणा व बैठकांपर्यंत न थांबता चक्काजाम आंदोलनात आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष सहभागी होण्याचे थेट आवाहन केले आहे.
आमदारांच्या आमरण उपोषणाच्या भूमिकेनंतर आंदोलनात काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रेल्वे कृती समितीने आमदार अमोल खताळ यांच्या राजकीय प्रवासावर टीका करताना म्हटले आहे की, सुरुवातीला रेल्वेचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमदारकी पणाला लावण्याची घोषणा त्यांनीच केली होती. त्यानंतर राज्य सरकार या रेल्वेसाठी १०० टक्के खर्च करणार असल्याचे सांगितले गेले, तर पुढे यातील अडथळ्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला.
मात्र या सर्वांनंतरही प्रत्यक्षात प्रश्न सुटलेला नाही. कृती समितीने चक्काजामची हाक देताच या आंदोलनाचा धसका घेऊन आमदारांनी तडकाफडकी दिल्ली गाठून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. आता आंदोलनाच्या तोंडावर त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. यावरून आमदारांना आता रेल्वे प्रश्नाची खरी वस्तुस्थिती समजल्याचे स्पष्ट होत असून, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी व्हावे असे समितीने नमूद केले आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ४० वर्षांच्या कार्यकाळावर आमदार खताळ यांनी नेहमीच प्रश्न उपस्थित केले होते. यावर बोलताना कृती समितीने स्पष्ट केले की, बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्रत्यक्ष पुढे नेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे केवळ आश्वासने आणि घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष काम आणि ठोस निर्णय हवा अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.
हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून संपूर्ण तालुक्याच्या विकासाशी निगडित असल्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवारचा दिवस संगमनेरच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खताळ ही ऐतिहासिक संधी दवडणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण लढ्यात आणि चक्काजाम आंदोलनाच्या हाकेमध्ये कृती समितीचे समन्वयक निलेश गुंजाळ, अनिल गुंजाळ, संदीप काकड, डॉ. सचिन वाळे, ॲड. अनिल गोडसे, राम अरगडे, अरुण चव्हाण, ओंकार बिडवे, सत्यजित थोरात, प्रवीण काकड, राहुल गायकर, मोहसीन शेख, सतीश खताळ, प्रदीप हासे, रवींद्र हासे, प्रवीण हासे, रामेश्वर पानसरे, प्रितम साबळे, अजय हासे, शिवाजी जगताप, विजय उदावंत, अमोल ढोले, आनंद खतोडे, सनी अभंग, अमोल शेलकर, शिवाजी गुंजाळ, निलेश गुंजाळ, प्रकाश कडलग आणि ॲड. समीर लामखडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,386
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

By Annant Ppangarkar24/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पावसाच्या खंडामुळे संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासन पूर्णपणे खंबीर…

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.