Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा मोठा स्ट्राईक! कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तिघांना ठोकल्या बेड्या, हे कारण आले समोर!
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा मोठा स्ट्राईक! कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तिघांना ठोकल्या बेड्या, हे कारण आले समोर!

दोन्ही घटनांप्रकरणी अनुक्रमे भिंगार कॅम्प आणि जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध हत्यारांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान भिंगार कॅम्प आणि जामखेड परिसरातून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, स्टील मॅगझीन आणि दोन मोबाईल असा तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बिहारमधील एका तरुणासह तिघांना बेड्या ठोकल्या असून, एक संशयित पसार झाला आहे.

बिहारचा तरुण जाळ्यात – बिहार मधील एक तरुण गावठी कट्टा विक्रीसाठी भिंगार नाला परिसरात आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १२ ऑगस्टच्या रात्री भिंगार कॅम्प हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पोलिसांनी तात्काळ परिसरात लावलेल्या सापळ्यामध्ये विकास कमल यादव (वय १८, रा. बिहार) आणि ओमकार अनिल शिंदे (वय २१, रा. अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून १ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे, स्टील मॅगझीन आणि २ मोबाईल (एकूण मूल्य १ लाख १९ हजार रुपये) जप्त करण्यात आले.

जामखेडमध्ये हद्दपार गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह ठोकल्या बेड्या – दुसऱ्या कारवाईत जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने जिल्ह्यातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार सागर बाळू लोखंडे (वय २६, रा. जामखेड) याला रंगेहात पकडले. हद्दपारीचा आदेश मोडून शहरात फिरणाऱ्या सागरकडून पोलिसांनी १ गावठी कट्टा, १ मॅगझीन आणि १ जिवंत काडतूस जप्त केले.

तपासादरम्यान, हा कट्टा कळसपिंप्री (ता. पाथर्डी) येथील गणेश दादासाहेब भवर याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली सागरने दिली. या माहितीनंतर पोलिसांनी गणेश भवरविरुद्धही गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

दोन्ही घटनांप्रकरणी अनुक्रमे भिंगार कॅम्प आणि जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 717
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ…

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.