Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध गुटखा व मावा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई; एकाच दिवशी ६ छापे टाकून १६ जणांवर गुन्हे दाखल, १.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अवैध गुटखा व मावा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई; एकाच दिवशी ६ छापे टाकून १६ जणांवर गुन्हे दाखल, १.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर:

स्वातंत्र्यदिनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, सुपा आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत एकाच दिवशी तब्बल ६ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण १६ आरोपींवर ६ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून १,३७,५८० रुपये किमतीचा अवैध मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, अनंत सालगुडे आणि इतर पोलीस अंमलदारांची चार विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून नेवासा, सुपा व पारनेर हद्दीत पंचांसमक्ष ६ ठिकाणी यशस्वी छापे मारले.

या धडक कारवाईत नेवासा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले असून त्यात गळनिंब येथील अल्ताफ सुभानभाई शेख याच्याकडून ११,२०० रुपयांचा, तर पाचेगाव येथील कानिफनाथ कर्नासाहेब तुवर याच्याकडून १६,००० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. नेवासा येथील तिसऱ्या कारवाईत १६ वर्षांच्या विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून ६४,००० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे, तर यातील अस्लम गणीभाई तांबाळी हा आरोपी फरार झाला आहे.

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत शहाजी छबन काळे, योगेश दत्तात्रय पवार आणि बबन बांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून २३,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे मारण्यात आले. पहिल्या कारवाईत जवळा येथील रोहिदास जगन्नाथ कोयते, फिरोज चाँद इनामदार यांना ताब्यात घेण्यात आले, तर आबिदा चाँद इनामदार, मनोहर बडे आणि मुन्नाभाई हे तिघे फरार झाले. यांच्याकडून ८,७३८ रुपयांचा साठा जप्त केला गेला. पारनेरमधील दुसऱ्या कारवाईत निघोज येथील अविनाश बाळासाहेब लंघे, विशाल तुकाराम गाडीलकर, रोहित पंढरीनाथ कोल्हे यांना अटक करण्यात आली असून सत्यम वरखेडे हा फरार झाला आहे. या पथकाने त्यांच्याकडून १४,५७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 735
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.