Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन
पुरस्कार

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

अमृत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष शैक्षणिक कर्ज सुविधा आणि रूप-टॉप सोलर योजना सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर : 

सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था असलेल्या ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड’ने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, बँकेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ ९००१:२०१५ (ISO 9001:2015) मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनाचे सर्टिफिकेट हस्तांतरण आणि बँकेच्या अद्ययावत कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन नुकतेच माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, हे मानांकन बँकेच्या उच्च दर्जाच्या ग्राहक सेवा, कार्यपद्धती आणि अंतर्गत नियंत्रण प्रणालीचे निदर्शक आहे. बँक डिजिटलायझेशनचे धोरण स्वीकारून, विविध विभागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करत ग्रामीण भागातील ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्व मापदंडांचे तंतोतंत पालन करत बँकेने व्यवसायासोबतच आपली गुणवत्ताही उत्तमरीत्या जपली आहे.

बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांनी हे मानांकन सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगत, यामुळे ठेवीदार आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला. रिझर्व्ह बँकेच्या सुशासन मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत राहून भविष्यातही हा दर्जा कायम ठेवण्यासाठी नियमित अंतर्गत लेखापरीक्षण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गुजराथी यांनी आरबीआयच्या नवीन परिपत्रकांची अंमलबजावणी आणि नव्याने येत असलेल्या डीपीडीपी ॲक्ट २०२३ कायद्याविषयी माहिती दिली.

मानांकन मिळवण्यासाठी विशेष योगदान देणारे बँक कर्मचारी अमोल घुले आणि विवेक सोनवणे यांचा यावेळी थोरात यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बँक लवकरच धांदरफळ आणि इगतपुरी तालुक्यातील साकुर या ठिकाणी दोन नवीन शाखा उघडणार असल्याचे त्यांनी घोषित केले. तसेच अमृत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष शैक्षणिक कर्ज सुविधा आणि रूप-टॉप सोलर योजना सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी बँकेचे संचालक मंडळ, अमृत उद्योग समूहाचे पदाधिकारी, ग्राहक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 523
आय एस ओ पुरस्कार सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.