Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा
गुन्हेगारी

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर तपासासाठी मिरजगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

अहिल्यानगर:

वाहनात लिफ्ट देण्याचा बहाणा करून एकट्या-दुकट्या ज्येष्ठ महिलांना मारहाणीची धमकी देत त्यांचे दागिने लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका महिला आरोपीसह तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून कार, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा तब्बल आठ लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मिरजगाव आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले साखळी चोरीचे (चैन स्नॅचिंग) दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

नागलवाडी (ता. कर्जत) येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला द्वारकाबाई उत्तम डाडर या २० ऑगस्ट २०२६ रोजी मिरजगाव येथे जाण्यासाठी रस्त्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी एका चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात पुरुष आणि महिला आरोपीने त्यांना मिरजगाव येथे सोडण्याचे आमिष दाखवून गाडीत बसवले. काही अंतर पुढे गेल्यावर आरोपींनी या वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि त्यांना चालत्या गाडीतून ढकलून देऊन पोबारा केला. या घटनेप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, जालींदर साखरे, प्रशांत राठोड आणि ज्योती शिंदे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास चक्रांना गती दिली.

तपासादरम्यान २५ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली की, हा गुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील रहिवासी लक्ष्मण जामदार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील कोमल भाऊसाहेब नन्नवरे यांनी मिळून केला आहे. संशयित महिला कोमल नन्नवरे ही अहिल्यानगर येथील तारकपूर बसस्थानक परिसरात थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तिला ताब्यात घेतले.

दरम्यान, तिचा मुख्य साथीदार हुंदाई औरा (AURA) कारने सोलापूर रोडने अहिल्यानगर शहराकडे येत असल्याचे समजताच पोलिसांनी कोंबडीवाला मळा परिसरात यशस्वी नाकेबंदी करत लक्ष्मण मोहन जामदार (वय २६, रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा) यालाही शिताफीने बेड्या ठोकल्या.

पाथर्डीतील दुसरा गुन्हाही आला समोर

पोलिसांनी दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी चार दिवसांपूर्वी नागलवाडी येथून वृद्ध महिलेला कारमध्ये लिफ्ट देऊन लुटल्याची कबुली दिली. यासोबतच, त्यांनी पाथर्डी ते अहिल्यानगर रस्त्यावरही एका वृद्ध महिलेला कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून तिला रस्त्यावर ढकलून दिल्याचे कबूल केले. या कबुलीमुळे पाथर्डी पोलीस ठाण्यातील एक गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपी लक्ष्मण जामदार याच्याकडून ७ लाख रुपये किमतीची विनाक्रमांकाची हुंदाई औरा कार, गुन्ह्यात वापरण्यासाठी गाडीत ठेवलेली ‘MH-42-BN-8999’ क्रमांकाची नंबर प्लेट, ९० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ८,००,५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

चौकशीत आरोपीने स्पष्ट केले की, जप्त केलेले सोन्याचे दागिने हे पाथर्डी भागातील चोरीचे असून, कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथून चोरलेले दागिने विकून आलेली रक्कम त्याने स्वतःच्या बँक खात्यात जमा केली होती.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर तपासासाठी मिरजगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कामगिरी बजावली असून, या कारवाईमुळे महामार्गावर लिफ्ट देऊन लूटमार करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 111
अहिल्यानगर एलसीबी गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: वाहनात लिफ्ट देण्याचा बहाणा करून एकट्या-दुकट्या ज्येष्ठ महिलांना…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.