Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या राजकारणात ‘भाऊबीजे’चा अनोखा ट्विस्ट! धुळ्याहून आलेल्या शुभांगी पाटलांकडून अमोल खताळांचे औक्षण!

11/11/2026

आमदार अमोल खताळ यांनी कुटुंबीयांसमवेत साजरी केली भाऊबीज; बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच सणाचा खरा संदेश

11/11/2026

बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजचे राशीभविष्य

11/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाढदिवस विशेष लेख — व्हिजनरी लीडर सत्यजित तांबे
महाराष्ट्र संवाद विशेष

वाढदिवस विशेष लेख — व्हिजनरी लीडर सत्यजित तांबे

लेखक डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार व जयहिंद लोकचळवळचे संस्थापक आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2026Updated:27/09/2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

डॉ. सुधीर तांबे
संस्थापक, जयहिंद लोकचळवळ
देशाच्या सर्वांगीण प्रगतीकरिता सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय क्षेत्रात चांगल्या प्रतिनिधीची गरज असते. दूरदृष्टी, बौद्धिक क्षमता, कामाचा मोठा आवाका, प्रभावी वकृत्व, विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी, अत्याधुनिक व्यवस्थापन आणि प्रशासनाची सांगड घालून समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वामध्ये आज सत्यजित तांबे यांचा राज्यातील अत्यंत प्रमुख व महत्त्वाच्या नावांमध्ये समावेश आहे.
खरे तर लहानपणापासूनच सत्यजित, हर्षल, करण हे हुशार होते. तिघेही आपल्या वर्गामध्ये पहिले यायचे. माझी इच्छा होती की सत्यजित यांनी डॉक्टर व्हावे किंवा अकॅडमिक्समध्ये आपले करिअर करावे. मात्र लहानपणापासूनच त्याला समाजकार्याची मोठी आवड असल्याने सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतंत्र असे आपले मोठे वलय त्यांनी तयार केले आहे.
२००४ मध्ये मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेच्या जागेसाठी मागणी केली, या वेळी अत्यंत लहान वयामध्ये संगणकावर त्यांनी छान मांडणी करून माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची आढावा पुस्तिका तयार केली. व्यवस्थापनशास्त्रामध्ये तो कायम अपडेट असतो. सरळधोपट विचार न करता सातत्याने नवीन आणि वेगळा विचार करून तो त्याची अंमलबजावणी करत असतो. जगभरातील नामांकित हार्वर्ड विद्यापीठातून तरुणांचे व्हिजन कसे असावे, याबाबत यंग लीडरशिपचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. याचबरोबर न्यूयॉर्क शहराचे महापौर गॅव्हिन न्यूसम यांच्या ‘सिटीझन्स विल’ या शहरांच्या विकासाची आधुनिक मांडणी आणि नागरिकांचा सहभाग याबाबतच्या, तरुण व राजकीय नेतृत्वासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले.
राजकारण-समाजकारणाबरोबर आणि या सर्व धावपळीतसुद्धा तो इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट आणि लॉचासुद्धा अभ्यास करत आहे. सत्यजित हे सातत्याने वाचन व चिंतन करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे आपले मतप्रदर्शन ते करत असतात. विशेषतः उद्योग, शिक्षण आणि आरोग्य यांवर केलेली मांडणी लोकांना खूप आवडते; त्यामुळे राज्यभरात त्यांचे मोठे चाहते आहेत. जिकडे जातील तिकडे त्यांच्याभोवती मोठा गराडा पडतो. युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकसुद्धा त्यांच्या या कामाबाबत अत्यंत आनंदी आणि समाधानी आहेत. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, प्रभावी वकृत्व यांमुळे त्यांचे राज्यभरात लाखो चाहते आहेत.
तो युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना शिरपूरमध्ये आदिवासी मुलांबरोबर त्यांनी संवाद साधला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मला ज्येष्ठ नेते अमरीशभाई पटेल यांचा फोन आला की, सत्यजित तांबे यांनी अत्यंत प्रभावीपणे आदिवासी युवकांशी संवाद साधून मांडणी केली आहे. खरे तर त्यांना लवकर राजकीय संधी मिळाली पाहिजे. याचबरोबर अनेकांनी मागणी केली की त्यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे आणि म्हणून त्यांना राजकीय संधी मिळावी, याकरिता मी पदवीधर निवडणुकीमध्ये माझ्याऐवजी त्यांना संधी दिली.
या संधीचे सोने करताना विधानमंडळाचे मोठे व्यासपीठ त्यांना मिळाले. विकासाची दूरदृष्टी, नवनवीन गोष्टी शिकण्याची पद्धत, अभ्यासपूर्ण मांडणी यांमुळे विधान परिषदेत अनेक प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. तरुणांच्या रोजगाराच्या बाबत ते सातत्याने आग्रही आहेत. इंडियाबुल्सचा प्रश्न, नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जैन साधूंच्या पायी चालण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न, युवकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात याकरिता इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याबाबतचा आग्रह, शिक्षकांचे प्रश्न, पदवीधरांचे प्रश्न हे मांडून त्याचा मोठा पाठपुरावा ते करत आहेत.
विकासाची दृष्टी, राजकारण, अर्थकारण आणि सर्वांना सोबत घेऊन सातत्याने काम करत असतात. अशा व्यस्त जीवनात त्यांच्यामध्ये असलेल्या कलावंताला ते वाव देतात. निसर्गसौंदर्याची मोठी जाणही त्यांना आहे.
जे काम करायचे ते मनापासून आणि अत्यंत पूर्ण कार्यक्षमतेने व प्रामाणिकपणे करायचे, ही त्यांची कार्यपद्धती आहे. विद्यार्थीदशेत एन.एस.यू.आय. (NSUI), विविध युवक संघटना, याचबरोबर युवक काँग्रेसच्या माध्यमातून झोकून देऊन त्यांनी काम केले. राज्यभर मोठा मित्रपरिवार उभा केला. ते कायम सगळ्यांच्या संपर्कात असतात. मित्रपरिवाराच्या अडचणीत सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि म्हणून राजकारणविरहित त्यांचे जीवाभावाचे अनेक सहकारी आहेत; हेच त्यांचे खरे भांडवल आहे. देशभरात मोठा संपर्क असल्याने त्यांच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी ओळखी आहेत. या ओळखींचा उपयोग करोना संकटकाळात नागरिकांना इतरत्र पोहोचवण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांनी केला. या काळात मदतीचे अहोरात्र काम केले. याचबरोबर टाळेबंदीच्या (लॉकडाउनच्या) काळात आमच्या कोळवाडे येथील डोंगरावर वृक्षारोपणासाठी मोठे काम करून फादर हर्मन बाकर यांच्या स्मरणार्थ ‘हर्मन हिल’ उभी केली.
जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून मी सामुदायिक विवाह सोहळे सुरू केले. यामध्ये गरीब-श्रीमंत असा भेद राहू नये म्हणून सत्यजितने स्वतः सामुदायिक विवाह सोहळा करावा, ही सूचना करताच त्यांनी ती अत्यंत मोठ्या मनाने मान्य केली. नातेवाईक, कुटुंब, सहकारी, मित्रपरिवार या सर्वांमध्ये ते अगदी चांगले रमतात. मुलगी अहिल्या हिच्यासमवेतचे त्यांचे वडील म्हणून असलेले नाते अत्यंत कौतुकास्पद आहे. छोट्या अहिल्याशी सातत्याने त्यांचा संवाद असतो.
साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, सहकार या सर्व विषयांची त्यांना अभिरुची आहे. तरुणांसाठी रोजगारनिर्मितीवर त्यांचा भर आहे. अर्थव्यवस्था आणि मॅनेजमेंट या विषयांचा ते सातत्याने अभ्यास करत असून तरुणांना यांमधून प्रोत्साहित करत असतात. अवघ्या दीड वर्षाच्या काळामध्ये आपल्या पूर्ण मतदारसंघात त्यांनी ५० अभ्यासिका निर्माण केल्या आहेत. सत्ताधारी-विरोधक यांपेक्षा रचनात्मक कामाला त्यांनी कायम प्राधान्य देऊन समाजकारण केले आहे.
देशाची प्रगती, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व याबाबत कायम अत्यंत परखड मत ते व्यक्त करत असतात. मायक्रोचिपबाबत भारताने पुढाकार घ्यावा, याबाबत त्यांनी प्रथमतः मत मांडले. हा अत्यंत मोठा विषय होता.
सोशल मीडियाच नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून अत्यंत मोठा गोतावळा निर्माण करणाऱ्या सत्यजितने आज राज्यपातळीवर समाजकारणातून आपला मोठा ठसा उमटवला आहे.
परंतु आज देशातील राजकारण एका वेगळ्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. अशा वेळेस तरुणांना संघटित करून हा समाज बदलण्यासाठी व त्यांना योग्य दिशा देण्यासाठी पारंपारिक पद्धतीच्या राजकरणापेक्षा अत्याधुनिक व्यवस्थापनशास्त्राने राजकारण करून या देशातील तरुणांना योग्य दिशा देऊन सुदृढ समाज निर्माण करावा, ही माझीच नव्हे तर आपल्या सर्वांची अपेक्षा आहे; आणि सत्यजित तांबे हे नक्की पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 284
वाढदिवस विशेष लेख सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

भाऊबीज : ओवाळणीच्या ताटापलीकडचे बहिणीच्या प्रेमाचे ऋण!

10/11/2026

दिवाळीच्याच दिवशी अकोले रोडवर बॅटरी दुकानाला भीषण आग; फटाक्यांची एक ठिणगी अन् क्षणात —!

09/11/2026

दिवाळी बोनसचा हक्क आणि बाबासाहेबांची श्रमिकदृष्टी!

06/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरच्या राजकारणात ‘भाऊबीजे’चा अनोखा ट्विस्ट! धुळ्याहून आलेल्या शुभांगी पाटलांकडून अमोल खताळांचे औक्षण!

By Annant Ppangarkar11/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक पदवीधर मतदारसंघात आमदार सत्यजित तांबे यांच्याविरोधात आक्रमक लढा देणाऱ्या शिवसेनेच्या…

आमदार अमोल खताळ यांनी कुटुंबीयांसमवेत साजरी केली भाऊबीज; बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच सणाचा खरा संदेश

11/11/2026

बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजचे राशीभविष्य

11/11/2026

अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा: ८०० किलो गोमांस जप्त, ५ संशयित ताब्यात

10/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.