Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

हे बालकुमार साहित्य संमेलन नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर येथे होत असल्याचा मोठा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होत असून, पुढील १०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संगमनेरमध्ये आयोजित करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत, असा महत्त्वपूर्ण मानस संमेलनाच्या स्वागताध्यक्ष, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, संगमनेर यांच्या संयुक्तवतीने मातोश्री लॉन्स येथे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये घेण्याच्या घोषणेनंतर उपस्थित साहित्यिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या उत्स्फूर्त कडकडाटात या प्रस्तावाचे स्वागत केले.

बोलताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेरला पाच नद्यांचा संगम लाभला असून कवी अनंत फंदी यांच्यापासून विचारवंतांची आणि साहित्यिकांची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक नामवंत साहित्यिक, कवी आणि लेखक आज संगमनेरचे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात उज्ज्वल करत आहेत.

लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये सातत्याने विविध वैचारिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असते. २०१० मध्ये संगमनेर पार पडलेल्या बालकुमार साहित्य संमेलनात विजया वाड आणि मंगेश पाडगावकर यांच्यासारख्या दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. साहित्यामधून संस्कार आणि संस्कृतीचे शिक्षण मिळते, असे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ‘अमृत मंथन’ व ‘अमृत गाथा’ ही पुस्तके लिहिली, ज्यातून या तालुक्याचा आणि सहकाराचा गौरवशाली इतिहास उभा राहतो. हे बालकुमार साहित्य संमेलन नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर येथे होत असल्याचा मोठा अभिमान असून, यासाठी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अनिल देशपांडे व सर्व सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत, असे सांगत त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 124
अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन घोषणा दुर्गाताई तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वाढदिवस विशेष लेख — व्हिजनरी लीडर सत्यजित तांबे

27/09/2026

विळद घाटातील मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाट; लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

26/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांची सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात पूजा करून मानाच्या ‘इच्छापूर्ती गणेशा’च्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात – नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचा सपत्नीक सहभाग

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.