Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

26/11/2026

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

घुलेवाडीतील युवकांनी उत्साहाने जपलेल्या या परंपरेचे विशेष कौतुक करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक परंपरा भक्तिभावाने जपली जात आहे. घुलेवाडी येथील साई स्वराज्य ग्रुपच्या वतीने वणी येथील आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी ज्योत आणण्यात आली. या पायी ज्योतीचे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना गेट येथे आगमन झाल्यानंतर माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्योतीचे दर्शन घेऊन तिचे उत्स्फूर्त स्वागत केले.

गुंजाळवाडी व घुलेवाडी येथील युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आणलेल्या या पायी ज्योतीचे पूजन केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी नवरात्रोत्सव हा भक्ती, शक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे सांगितले. अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे युवकांमध्ये श्रद्धा, भक्तिभाव आणि एकतेची भावना निर्माण होते, तसेच सामाजिक एकोपा अधिक दृढ होऊन सांस्कृतिक परंपरांचे जतन होते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रातील चारही शक्तिपीठांचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांनी भारतीय परंपरेत महिलांना आदराचे स्थान असल्याचे सांगून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर होत असल्याचे अधोरेखित केले. संगमनेर तालुका हा अध्यात्म आणि पुरोगामी विचारांची जोड जपणारा असून, येथील सर्व नागरिक एकत्र येऊन सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. गावोगावी महिला भगिनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात, असेही ते म्हणाले.

यावर्षी तालुक्यावर दुष्काळाचे संकट असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जगदंबा मातेच्या कृपेने उर्वरित काळात चांगला पाऊस होऊन बळीराजासह सर्वांना दिलासा मिळो आणि सर्व नागरिक सुखी-समाधानी राहोत, अशी प्रार्थना त्यांनी श्री देवीच्या चरणी केली. घुलेवाडीतील युवकांनी उत्साहाने जपलेल्या या परंपरेचे विशेष कौतुक करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 355
नवरात्र उत्सव बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026

ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात

26/11/2026

नाट्यगृहावरून राजकीय नाट्य रंगले… विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून प्रसिद्धीपत्रक काढले, कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे लोकार्पण दुष्काळामुळे साध्या पद्धतीने; ३.३३ लाखाची मदत दुष्काळ निधीसाठी: गटनेत्या दिपाली पंचारिया

26/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

By Annant Ppangarkar26/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज- अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी जलस्रोतांचे बळकटीकरण, प्रलंबित नळ योजनांची…

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026

ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात

26/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.