Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी
राजकारण

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

औद्योगिक क्षेत्राच्या उद्घाटनासाठी लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना संगमनेरमध्ये आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथेच प्रस्तावित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) उभारणी होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. 

खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही जण एमआयडीसी घारगाव किंवा बोटा येथे होणार अशा वावड्या उठवून केवळ स्टंटबाजी करत असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता आमदार सत्यजित तांबे यांना लगावला. कौठे मलकापूर येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि औद्योगिक विकासाला गती मिळावी, यासाठी कौठे मलकापूर येथे एमआयडीसी उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

या पाहणीदरम्यान महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शंकर बर्गे, अहिल्यानगरचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, पुण्याचे कार्यकारी अभियंता संजय कोतवाड, अहिल्यानगरचे उप रचनाकार सुहास लाहोटी, सहाय्यक अभियंता राहुल बळी, प्रमुख भूमापक फुलचंद कातकडे, एकनाथ ठाकरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खताळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या एमआयडीसीची आग्रही मागणी केली होती. संगमनेरमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनीही या प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच या प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असणारे पाणी राखीव ठेवण्याचा शब्द जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.

गेल्या चाळीस वर्षांत जे साध्य झाले नाही, ते एका सर्वसामान्य तरुणाने अवघ्या दीड वर्षात करून दाखवले याचे शल्य मनात बाळगून विरोधक विकासकामांत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. जनतेने नाकारलेल्या लोकांनी आता विकासकामांत विनाकारण अडथळे आणू नयेत, अन्यथा जनता आगामी काळात योग्य ते उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कौठे मलकापूर येथे अनेक नामांकित कंपन्यांनी गुंतवणुकीची तयारी दर्शवली असून, या औद्योगिक क्षेत्राच्या उद्घाटनासाठी लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना संगमनेरमध्ये आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 264
Midc अमोल खताळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशातील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा…

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

सोमवार, १२ ऑक्टोंबर जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.