Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दांडियाच्या तालावर थिरकल्या पद्मश्री राहीबाई आणि नगराध्यक्ष दुर्गाताई
सामाजिक

दांडियाच्या तालावर थिरकल्या पद्मश्री राहीबाई आणि नगराध्यक्ष दुर्गाताई

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2022Updated:30/09/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

लायन्स इनरव्हील दांडिया महोत्सव
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अनेक वर्षाच्या सुरू असलेल्या उत्सवावर गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट घोंगावत होते. कोरोना निर्बंधानंतरचा पहिलाच नवरात्र उत्सव पार पडत असून या उत्साहात लयबद्ध तालावर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि संगमनेरच्या प्रथम महिला नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांना देखील ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

लायन्स इनरव्हीलच्या वतीने मालपाणी लॉन्स मध्ये डीजे दांडिया नाईट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्यासह नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इनरव्हील जिल्हा उपाध्यक्ष रचना मालपाणी, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट राजेश लाहोटी, इनरव्हीलच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, मयूर ज्वेलर्सचे महेश मयूर, वैशाली मयूर आदी यावेळी उपस्थित होते.

दोन वर्षाच्या खंडानंतर नवरात्र महोत्सवात महिलांचा मोठा उत्साह दिसून आला. सकारात्मक ऊर्जेने आशावादी भविष्याची आस घेऊन जमलेल्या असंख्य महिलांमध्ये नवदुर्गेचे रूप दिसत होते. विघ्नहर्ता आणि दुर्गा मातेची आरती करून संगीताच्या लयबद्ध ठेक्यावर दांडिया महोत्सव बुधवारी सुरू झाला.

नवरात्र महोत्सवात लिटल स्टार लिटल चॅम्प्स अँगल ग्रुप स्वीट अँगल सिक्रेट सुपरस्टार यांनी पारितोषिके पटकाविली. महोत्सवात उत्कृष्ट प्रशासकीय शिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, उत्कृष्ट होम मेकर कमलाबाई आसावा, उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट हर्षा खाडे, उत्कृष्ट व्यावसायिक रूपाली गग्गड, उत्कृष्ट कुक संगीता मयूर, उत्कृष्ट पोलीस अधिकारी निकिता महाले, उत्कृष्ट आर्किटेक्ट कोमल लाहोटी, उत्कृष्ट एसटी कंडक्टर शिला वाकचौरे या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.

लायन्स झोन चेअर पर्सन सुधीर डागा, सुमित भट्टड, समता पतसंस्थेच्या स्वाती कोयटे, संदीप जाधव, अमोल खटाटे, सचिन आवारी, अमोल देशमुख, रेखा तवरेज, विजय ताजने, आदी यावेळी उपस्थित होते. तर लायन्स सेक्रेटरी विनायक कुलकर्णी, योगेश कोळकर, ज्योती पलोड, सुनिता गाडे, प्रकल्प समिती प्रमुख राखी करवा, सरला आसावा, कोमल लाहोटी, स्मिता मालाणी, सुनिता पगडाल, नेहा सराफ, पूनम राजपाल, धनश्री घोडेकर, वैशाली खैरनार, आदींनी महोत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

भारतीय संस्कृतीत उत्सवाला महत्त्व आहे. स्त्री ही अबला नव्हे तर देवी दुर्गामातेचे प्रतीक आहे. आणि दुर्गामाता ही शक्तीचे प्रतीक आहे. हीच शक्ती नवनिर्माण घडवू शकेल.
पद्मश्री राहीबाई पोपेरे.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 118
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.