Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चांगल्या समाज निर्मीतीसाठी जिजाऊ ब्रिगेडने पुढे यावे
सामाजिक

चांगल्या समाज निर्मीतीसाठी जिजाऊ ब्रिगेडने पुढे यावे

जिल्हा उपाध्यक्षपदी वृषाली कडलग, जिल्हा कार्याध्यक्षपदी निर्मला गुंजाळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

कोणत्याही कामाजी लाज न बाळगता विविध व्यवसायात महिलांनी पारंगत झाले पाहिजेत. सक्षम होवून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विज्ञानवादी विचारसरणी स्विकारण्यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नशील आहे. सेवा संघात महिलांना मानाचे स्थान असून घरोघरी जिजाऊ पारायण होण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने पुढे यावे व चांगला समाज घडवावा असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तनपुरे यांनी केले.

संगमनेर मराठा सेवा संघाचा ‘जनसंवाद’ शासकीय विश्रामगृहात झाला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, चंद्रकांत नवले, संपत देशमुख, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सदस्य डॉ. दिपाली पानसरे, जिल्हाध्यक्ष श्रध्दा वाणी, जिल्हा उपाध्यक्ष वृषाली कडलग उपस्थित होते.

तनपुरे म्हणाले, समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा नष्ट करुन कालानुरूप बदलत विज्ञानवादी समाज निर्मीतीचे काम सुरु आहे. केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, सरकारी मदतीची वाट न बघता जमेल तो व्यवसाय करायला हवा. एक कोटीच्यावर सभासद संख्या असलेल्या या संघटनेत सामान्य माणसापासून ते वर्ग १ च्या अधिकाऱ्यापर्यत लाखो लोक सेवा संघाचे पदाधिकारी आहेत.

जिल्हाध्यक्ष श्रध्दा वाणी यांनी जिल्ह्याचा आढावा घेत जिल्हा पातळीवर निवड प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिली. निवड प्रक्रियेत होतकरु महिलांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. विभागीय अध्यक्ष भदाणे यांनी जनसंवाद दौऱ्याचा हेतू विषद केला.

यावेळी तालुका उपाध्यक्ष सुवर्णा खताळ, तालुका कार्याध्यक्ष नीलम शिंदे, शहराध्यक्ष वृषाली साबळे, प्रसिध्दी प्रमुख अडव्होकेट सीमा काळे, सचीव स्नेहलता कडलग, सहसचीव जयश्री चव्हाण, श्रध्दा देशमुख, उज्ज्वला देशमुख, प्रियंका सुलताने, मयुरी गाडेकर, अनुराधा काळे, कावेरी राहाणे आदी उपस्थित होत्या. माधुरी शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दिपाली पानसरे यांनी मानले.

काळानुरुप महिलांनी बदल स्विकारावा

सध्याचे युग स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात महिलांनीदेखील बदलत्या काळानुरुप आपल्यात बदल करण्याची गरज आहे. मात्र हे बदल स्विकारत असतांना आपली संस्कृतीदेखील टिकावयास हवी याकडे लक्ष द्यायला हवे. येथील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात पुढे असतात हे कौतुकास्पद आहे.

दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष

जिल्हा उपाध्यक्षपदी वृषाली कडलग, जिल्हा कार्याध्यक्षपदी निर्मला गुंजाळ

यावेळी झालेल्या पदाधिकारी निवडीत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वृषाली कडलग यांची तर जिल्हा कार्याध्यक्षपदी निर्मला गुंजाळ, मालदाड ग्राम शाखा अध्यक्षपदी सुधा नवले यांच्या निवडी करण्यात आल्या. नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 142
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.