महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सुसंस्कारित पिढी घडवण्याबरोबरच स्त्रियांनी स्व-संरक्षणार्थ सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या शारदा कर्पे यांनी केले.
विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी संगमनेर प्रखंडाने दुर्गावाहिनीच्या स्थापना दिनी दुर्गाष्टमी निमित्त संगमनेरातील माऊली फर्निचर हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कर्पे “जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पूजा जाधव उपस्थित होत्या.
कर्पे म्हणाल्या, सरस्वती नको सावित्री हे राजकारण सध्या सुरू आहे, सरस्वती ही विद्येची देवी असून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाचा पुढाकारामुळेच आपण सुशिक्षित झालो आहे, त्यामुळे दोन्हीही आमच्यासाठी पूज्यनीय आहे.
या कार्यक्रमात हिंदु संस्कृती, महिला सक्षमीकरण, लव-जिहाद सारख्या अनेक विषयांवर प्रबोधन केले गेले. पारंपारिक वेशभूषा, ऐतिहासिक विषयात प्रश्न मंजूषा,संगीत खुर्ची घेण्यात आली व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. स्व संरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित महिलांना लव जिहादचे पुस्तक व भेटवस्तु दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात कादंबरी बेल्हेकर यांनी त्रिवार ओमकार, एकात्मता मंत्र व विजयी मंत्र घेऊन केली. सूत्रसंचलन शहर संयोजिका गुंजन कर्पे यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने युवती उपस्थित होत्या.
दुर्गावाहिनीच्या अस्मिता कर्पे, प्रेरणा कोदे, साक्षी वडनेरे, वैष्णवी शिंदे,अश्विनी कोळी, समृद्धी बारड, श्रावणी वालझाडे, वैष्णवी वालझाडे, कावेरी बेल्हेकर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

