Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निर्जळी | पाईपलाईन तुटल्याने शहराच्या बहुतांशी भागाला शुक्रवारी पाणी मिळणार नाही
प्रशासन

निर्जळी | पाईपलाईन तुटल्याने शहराच्या बहुतांशी भागाला शुक्रवारी पाणी मिळणार नाही

म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाची आमदार डॉ. तांबे यांनी केली पाहणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
स्वामी समर्थ मंदिरापासून साई मंदिर, प्रवरा नदीवरील घाटाकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे खचल्याने या पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या आहेत. पालिका प्रशासनाने त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असले तरी शुक्रवारी शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दरम्यान गुरुवारी दुपारी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, या प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र वाकचौरे व शैलेश कलंत्री, पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती सोमेश्वर दिवटे, नितीन पापडेजा आदींनी या पुलाची पाहणी केली आणि कामासंदर्भात पालिका प्रशासनाला सूचना केल्या. मात्र ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत या पुलाचे बांधकाम येते. त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र येथे उपस्थित नव्हते. पूल खचल्याचे लक्षात येतात प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने दूरच्या रस्त्याने या परिसरातील नागरिकांची ये-जा सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या या पूलाच्या बांधकामास निधी अभावी किती कार्यकाल लागू शकतो याचा निश्चित अंदाज नसल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची चिन्हे आहे. दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शासकीय पातळीवर निधी उपलब्ध होण्याकरिता पाठपुरावा सुरू केला आहे. तर पालिकेच्या अतिरिक्त असलेल्या कामास सुरुवात झाली आहे. दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्यामुळे शहरातील काही झोनवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, पाणी जपून वापरण्याचे व नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.

या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद
★ नेहरू गार्डन जलकुंभ संपूर्ण झोन :- पोलीस लाईन, देवाचा मळा, मेनरोड, मोमीनपुरा, तीनबत्ती चौक, स्टेडियमजवळ, अभंग मळा, पंजाबी कॉलनी, सावता माळी नगर, माळीवाडा, अशोक चौक इत्यादी परिसर.
★ परदेशपुरा टाकीवरील झोन :- नाईकवाडपुरा, परदेशपुरा, घासबाजार, देवीगल्ली, जोर्वेरोड चौक, डाके मळा, सय्यदबाबा चौक इत्यादी परिसर

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 130
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.