Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला
प्रशासन

अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून 'ईडी' सरकारमध्ये पडली होती वादाची ठिणगी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून ‘ईडी’ सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती, त्या बहुचर्चित बदल्या अखेरीस करण्यात आले आहे. आपल्या पोलीस दलातील पहिल्याच नियुक्तीत श्रीरामपूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेल्या राकेश ओला यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

शिंदे फडणवीस सरकारने प्रथमत:च आयपीएस अधिकाऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. ऐन दीपावलीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अखेर गृह विभागाने काढले आहेत. यातील 24 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर अन्य अधिकाऱ्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अहमदनगरचे सध्याचे एसपी मनोज पाटील यांचाही समावेश असून त्यांच्या बदलीसंदर्भात पून्हा नव्याने आदेश काढले जाणार आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा नगरमधील कालावधी पुर्ण होण्याच्या एक वर्ष अगोदरच त्यांना येथून हटविण्यात आले आहे. महिनाभरात घडलेल्या पोलीस दलातील काही घटनांमुळे पाटील चांगलेच चर्चेत आले होते. आपल्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखू न शकल्याने ते वादग्रस्त ठरण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच त्यांची बदली करण्यात आली आहे. ओला त्यांच्या जागी पदभार घेतील. ओला सध्या नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून नियुक्तीस होते.

२०१२ च्या आयपीएस बॅचचे अधीकारी असलेले ओला सरळ सेव भरतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांना सर्वप्रथम श्रीरामपूरला नियुक्ती मिळाली होती. येथील कालावधीत त्यांनी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीचा छडा लावला होता. त्यांचा येथील कार्यकाल गाजला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 166
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.