Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये लंम्पी चर्मरोगाने मृत झालेल्या ‘एवढ्या’ जनावरांचे नुकसान भरपाई मागणीचे प्रस्ताव दाखल
प्रशासन

संगमनेरमध्ये लंम्पी चर्मरोगाने मृत झालेल्या ‘एवढ्या’ जनावरांचे नुकसान भरपाई मागणीचे प्रस्ताव दाखल

बाधीत जनावरांच्या विलगीकरणाची जबाबदारी साखर कारखान्यांची
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुशधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाने मृत झालेल्या पशुधनाची संख्या मंगळवारपर्यत ६५ वर गेली आहे. यापैकी ४२ पशुधनाचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून उर्वरित प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

राज्यात उद्भवलेल्या गो व महिप वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीची बैठक संगमनेरमध्ये तहसीलदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक आयुक्त डॉ. जे. के. तिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जोंधळे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, युटेक शुगरचे कार्यकारी संचालक बी. एन. पवार यावेळी उपस्थित होते.

बैठकीत बाधित पशुधन आणि लसीकरणाचा आढावा घेण्यात आला.

कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले असून ऊसतोड मजुरांकडील गुरांची साखर कारखान्याकडे वाहतुकीस परवानगी संदर्भात संबधितांना आदेश देण्यात आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सुचनेनुसार लसीकरण होवून २८ दिवस पुर्ण झालेल्या पशुधनास आरोग्य प्रमाणपत्र देण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या. लसीकरण न झालेल्या पशुधनाच्या साहाय्याने कोणतीही ऊस वाहतूक केली जाणार नाही. यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.

पशुधनास लंम्पी आजाराची बाधा झाल्यास बाधीत पशुधनाच्या विलगीकरणाची व उपचाराची जबाबदारी कारखान्यांची राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पशुधनावर नियंत्रणासाठी कारखाना प्रशासन, पोलीस विभाग, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह तपासणी नाके कार्यान्वीत करण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या.

संगमनेर तालुक्यामध्ये १२४ गावात १२६६ पशुधन लम्पीने बाधीत आढळले आहे. त्यापैकी ७२४ पशुधन उपचारानंतर बरे झाले. तर ४७७ बाधीत पशुधनावर उपचार सुरु आहेत. तालुक्यात १९ ऑक्टोंबरपर्यत १८७२०४ पशुधनाच्या लसीकरणाचे काम पुर्ण झाले. उपचारादरम्यान प्रतिसाद न देणाऱ्या अथवा गंभीर आजारी असलेल्या पशुधनाच्या विविध चाचण्या करण्यात येत आहेत. चाचणीच्या निष्कर्षानुसार तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार पध्दतीत बदल केले जात आहे. तसेच पशुधनाचे लसीकरण, बाधीत पशुधनावर उपचार, त्यासाठी आवश्यक औषधे घरपोहोच सेवा मोफत देण्याची कार्यवाही संबधित विभागामार्फत सुरु आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 196
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.