Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘भारत जोडो यात्रे’ने लोकशाहीच्या विचारांना ताकद मिळणार : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
राजकारण

‘भारत जोडो यात्रे’ने लोकशाहीच्या विचारांना ताकद मिळणार : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

7 नोव्हेंबरला राज्यात 'देगलूर'मध्ये होणार भव्य स्वागत! भारत जोडो यात्रेची रूपरेषा थोरात यांनी केली स्पष्ट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. 7 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रमध्ये प्रवेश करणार असून लोकशाहीच्या विचारांना ताकद देणाऱ्या या यात्रेचे देगलूरमध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे.

महाराष्ट्रात या यात्रेचा प्रवास 381 किलोमीटरचा राहणार असून या दरम्यान दोन भव्य सभा देखील होणार आहेत. याबद्दलची उपरेषा माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली.

नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. नांदेड ते बुलढाणा दरम्यान 14 ठिकाणी या यात्रेचा मुक्काम राहणार असून 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पहिल्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण या यात्रेचे नांदेडमधील नियोजन करत आहे. महाराष्ट्रातील यात्रेचे पूर्ण नियोजन झाले असून या प्रवासादरम्यान यात्रा कळंबोलीला एक दिवसाची विश्रांती घेणार आहे.

दुसरी आणि शेवटची सभा 18 नोव्हेंबरला शेगावमध्ये होणार असून या अगोदर खासदार राहुल गांधी संत गजानन महाराजांचे दर्शन देखील घेणार आहेत.

यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 8 आणि 9 नोव्हेंबरला यात्रेत सामील होणार आहे तर शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध पक्षांचे बडे नेते देखील सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून जाणाऱ्या या यात्रेबद्दल अनेकांना उत्सुकता आहे यात्रेच्या 381 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान अनेक लोक या यात्रेत सहभागी होणार आहेत. ही यात्रा महाराष्ट्रात देखील इतर राज्याप्रमाणे लक्षवेधी ठरेल.

देशहित आणि राज्य घटनेशी बांधिलकी मानणारा काँग्रेस पक्ष असल्याने यात्रेमुळे या विचारसरणीला ताकद मिळणार आहे. आज केवळ काँग्रेस पक्षासमोर संकटे नाहीत तर ही संकटे स्वातंत्र्य लढ्यातून ताऊन सुलाखून जी विचारसरणी निर्माण झाले आहे, त्या विचारसरणीसमोर संकटे आहेत. यात्रेच्या निमित्ताने या विचारसरणीला बळकटी मिळणार असून पर्यायाने त्याचा फायदा काँग्रेसला देखील होईल.

आज सामान्य माणूस या यात्रेबद्दल उत्सुक आहे. मोबाईल अथवा इतर माध्यमातून ते यात्रेची माहिती घेत आहेत. राजकारणापलीकडील लोकही या यात्रेबद्दल उत्सुकता दाखवत आहे. या माध्यमातून निर्माण होत असलेली ऊर्जा सर्वत्र पोहोचेल असा विश्वास आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे यासह बेरोजगारीचा प्रश्न देखील गंभीर बनल्याने हे दोन मुद्दे यात्रेदरम्यान समोर येतील, असे थोरात यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 119
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.