Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लहान मुलीस मारल्याच्या प्रकरणातून पती-पत्नीची निर्दोष सुटका
न्यायालय

लहान मुलीस मारल्याच्या प्रकरणातून पती-पत्नीची निर्दोष सुटका

संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2022Updated:06/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

चौथीही मुलगी झाली म्हणून पती-पत्नीने तिला विहीरीत टाकून मारले, मात्र बिबट्याने तिला पळवून नेल्याचा बनाव केला म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पती-पत्नीची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २०१४ मध्ये ही घटना घडली होती. सुदाम भिमाजी कोटकर आणि उज्ज्वला सुदाम कोटकर अशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या पती-पत्नीची नांवे आहेत.

संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २१ जानेवारी २०१४ रोजी बिबट्याने आठ दिवसांच्या मुलीस पळवून नेल्याची घटना घडली होती. या चिमुरडीचा मृतदेह रामनाथ नामदेव कोटकर यांच्या शेतातील विहीरीत आढळून आला होता. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवयानी पाटील यांनी या घटनेचा तपास करत या मुलीच्या आईवडीलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी तपासात चौथी मुलगी झाल्याने आईवडीलांनीच तिला विहीरीत टाकून मारले आणि तिला बिबट्याने पळवून नेल्याचा बनाव केला असल्याचा निष्कर्षाप्रत आले. सहाय्यक निरीक्षक देवयानी पाटील यांनी स्वत: फिर्यादी होत सुदाम भिमाजी कोटकर आणि उज्ज्वला सुदाम कोटकर या दाम्पत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास देवयानी पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी केला तर आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र निरीक्षक एस. वाय. सोमवंशी यांनी दाखल केले होते.

 

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. आमेटा यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरु होती. आरोपीच्या वतीने ॲड. विवेक बोराडे यांनी काम बघितले. ॲड. बोराडे यांनी या खटल्यात ग्रामीण भागात शौचालयाची व्यवस्था नसल्याने आरोपी पहाटेच्या वेळी शौचास घराबाहेर गेले असताना या बालिकेला बिबट्याने पळविले. तसेच पहाटेच्या अंधारामध्ये विहिरीचा अंदाज न आल्याने ही बालिका विहीरीत पडली. असा बचाव आरोपीच्यावतीने वकीलांकडून करण्यात आला.

या खटल्यामध्ये एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. न्यायाधीश आमेटा यांनी समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती देण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 121
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.