Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात गेल्याने राज्यात बेरोजगारी वाढणार; आमदार डॉ. सुधीर तांबे
सामाजिक

महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात गेल्याने राज्यात बेरोजगारी वाढणार; आमदार डॉ. सुधीर तांबे

राज्यात उद्योग वाढीकडे लक्ष न दिल्यास भविष्यात उसळणारा बेरोजगारीचा आगडोंब ठरेल घातक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

फॉक्सकॉन, वेदांता सेमीकंडक्टर असे एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरणारी असून टेक्निकल शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी राज्यात रोजगार निर्मिती न होणे आणि येणारे उद्योग परराज्यात जाणे, यामुळे येथील बेरोजगारीत मोठी वाढ होणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.

सह्याद्री महाविद्यालयामध्ये झालेल्या युवक करिअर मार्गदर्शन मेळाव्यात आमदार डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते. डॉ. बाळासाहेब वाघ, प्रा. शिवाजी नवले, प्रा. लक्ष्मण घायवट व्यासपीठावर उपस्थित होते.

तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या तीन महिन्यात वेदांता, फॉक्सकॉनसह काही मोठे उद्योग गुजरात व इतर राज्यात गेले आहेत. राज्यातील कौशल्य आधारित शिक्षण प्रणालीमुळे बाहेर गेलेल्या उद्योगांमध्ये अनेक बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळाल्या असत्या. मात्र सरकारच्या धोरणामुळे उद्योग परराज्यात गेल्याने या संधी आपल्याला गमवाव्या लागल्या आहेत.

महागाई, बेरोजगारी देशातील सर्वात मोठे समस्या ठरत असताना केंद्र सरकार मात्र याकडे लक्ष देण्याऐवजी युवकांना व्हाट्सअप व सोशल मीडियामध्ये गुंतवून ठेवत धार्मिक बाबींवर लक्ष केंद्रित करत आहे. अशा स्थितीत सध्याच्या तरुणांना बेरोजगारीची समस्या जाणवत नसली तरी येत्या काही काळातील हे फार मोठे संकट आपल्यासमोर आहे. सरकारने राज्यातील उद्योग वाढीकडे लक्ष देणे आवश्यक असून असे न घडल्यास भविष्यात बेरोजगारीचा उसळणारा आगडोंब घातक ठरेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक बाळासाहेब वाघ यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 120
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.