Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वेगळ्या विदर्भासाठी पुन्हा आंदोलन उभे राहणार
आंदोलन

वेगळ्या विदर्भासाठी पुन्हा आंदोलन उभे राहणार

नितीन गडकरींसह 10 खासदारांचा राजीनामा मागणार : अरुण केदार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा पुढे येऊ लागली आहे. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी नितीन गडकरी यांच्यासह दहा खासदारांचा राजीनामा मागितला जाणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे.

या संदर्भात समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांनी म्हटले आहे की, संसदेत या खासदारांनी विदर्भ स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी ठराव न केल्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे. विदर्भा संदर्भात खासदारांना प्रेम राहिले नसल्याने या खासदारांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना राजीनामा मागितला जाणार आहे. वेगळ्या विदर्भासाठी भुवनेश्वर मधील अधिवेशनात भारतीय जनता पक्षाने ठराव केला होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं मात्र ते पाळले गेले नाही.

देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना देखील वेगळ्या विदर्भाचा विसर पडला आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीची त्यांना आठवण व्हावी यासाठी हे आंदोलन असल्याचे केदार यांनी म्हटले आहे.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जनमत चाचणी घ्यायला हवी, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. त्यावेळी लहान राज्यांना भाजपने नेहमीच समर्थन केले आहे. जेव्हा लहान राज्य गठीत होतील तेव्हा विदर्भ वेगळे राज्य झाले पाहिजे. अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला महत्त्व येत आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये स्थानिक जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली देखील आंदोलने केली जाणार आहेत. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड या राज्यांची निर्मिती झाली त्यावेळी कुठे लोकांचा पाठिंबा होता असा प्रश्न उपस्थित करत केवळ राजकीय तुकडे पाडण्यासाठी भाजपने ते केले. तर तेलंगणा राज्याचे निर्मिती फक्त जनआंदोलनातून झाली असून आता महाराष्ट्रातले देखील हीच परिस्थिती निर्माण झाल्याचे केदार यांनी म्हटले आहे.

यंदाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन करण्याची भूमिका विदर्भ राज्य समितीने घेतली आहे. विदर्भातील खासदार आणि त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र विदर्भ राज्य संदर्भातील भूमिका जाहीरपणे स्पष्ट करण्याची मागणी ॲड. वामनराव चटप यांनी केली होती. चंद्रपूर मध्ये वामनराव चटप आणि नागपूर मध्ये अरुण केदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 113
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.