Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून संगमनेर पंचायत समितीने घरपट्टी, पाणीपट्टीची केली तब्बल साठ लाखांची वसुली
न्यायालय

राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून संगमनेर पंचायत समितीने घरपट्टी, पाणीपट्टीची केली तब्बल साठ लाखांची वसुली

लोक न्यायालयाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुका ठरला थकबाकी वसुलीमध्ये अव्वल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून संगमनेर पंचायत समितीने तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीची तब्बल साठ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारची वसुली करण्यात संगमनेर पंचायत समिती अव्वल ठरली.

गावच्या विकासात ग्रामपंचायतीचे योगदान महत्वाचे आहे. त्याकरीता घरपट्टी व पाणीपट्टीची वसूली देखील महत्वाची आहे. जनतेने सदरचा कर वेळेत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होते. नागरिकांनी कोणत्याही सरकारी कराचा भरणा करणे त्यांच्या हिताचे असते, मात्र ग्रामपंचायतीचा घरपट्टी, पाणीपट्टीचा कर थकविणारे अनेक महाभाग आहेत. वारंवार मागणी करून देखील घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा न करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १०२२० खातेदारांविरोधात थकबाकीचा भरणा करण्यासंबंधीच्या नोटीसा न्यायालयामार्फत बजाविण्यात आल्या होत्या. ही सर्व प्रकारने राष्ट्रीय लोक न्यायालयासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. यात २२४७ खातेदारांनी तडजोडीअंती ५९ लाख १३ हजार ९६० रुपयांचा भरणा केला आहे.

लोक न्यायालयाच्या माध्यमातून कशाप्रकारे कामकाज केले जाते, यासाठी संगमनेर वकील संघाचे पदाधिकारी ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील, मोहन फटांगरे यांनी जनजागृती करत लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय एच आमेठा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली न्यायाधीश एम. एच. शेख, न्यायाधीश एस. एस. बुद्रुक, न्यायाधीश पी. डी. देवरे यांच्यासमोर हे कामकाज चालले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कराची वसुली करण्यात संगमनेर पंचायत समिती अहमदनगर जिल्ह्यात अव्वल ठरली. या संदर्भाने न्यायाधीशांनी नुकताच पंचायत समितीचे सभागृहामध्ये ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वसुली कशी करता येईल, या दृष्टीने मार्गदर्शन केले होते. यासाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पंचायत समितीमार्फत उत्तम कामगिरी केली जाईल असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने दिले होते. संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले. त्याला तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कक्ष अधिकारी राजेंद्र तिटमे, विस्तार अधिकारी पंचायत राजेंद्र कासार, राजेंद्र ठाकूर, सुनील माळी, सदानंद डोखे यांनी परिश्रम घेतले.

या ग्रामपंचायतींनी केली मोठी वसुली

घुलेवाडी ७ लाख ६१ हजार ५४७, आश्वी बुद्रुक ५ लाख ७९ हजार, पेमगिरी ५ लाख ५१ हजार १२४, गुंजाळवाडी ४ लाख ८५ हजार ८०३, सुकेवाडी ३ लाख ८४ हजार ५०, वेल्हाळे ३ लाख ५६ हजार ८०, आंबी खालसा २ लाख ७१ हजार ५१३, समनापूर १ लाख ९४ हजार ९४०, निमगाव जाळी १ लाख ७८ हजार ४६६, मंगळापूर १ लाख १३ हजार २३५ रुपयांची वसूली करण्यात आली आहे. १९ ग्रामपंचायतीच्या वसूली शुन्य झाल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 154
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.