Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रस्ता दुरुस्तीचे काम पूर्णत्वास न गेल्याने अजून काही दिवस अहमदनगर-मनमाड रस्ता राहणार बंदच
प्रशासन

रस्ता दुरुस्तीचे काम पूर्णत्वास न गेल्याने अजून काही दिवस अहमदनगर-मनमाड रस्ता राहणार बंदच

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

वाहतुकीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असलेल्या अहमदनगर- मनमाड या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अहमदनगर-मनमाड महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर- येवला मार्गे वळविण्यात येणार आहे.

शनि शिंगणापुर-सोनई रोडवरुन वरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणाऱ्या अवजड वाहतूकदारांनी राहुरीकडे न येता अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरुन इच्छित स्थळी जाता येणार आहे.

मनमाड – येवला – शिर्डी कडून अहमदनगर मार्गे पुणे-मुंबई-कल्याणकडे जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा फाटा, झगडे फाटा (रा.म.मा.क्र.१६० ब)-सिन्नर (रा.म.मा.क्र.१६०)सिन्नर-नांदुर शिंगोटे-संगमनेर आळेफाटा मार्ग वळविण्यात येणार आहे. मनमाड- येवला कडून अहमदनगर-सोलापूर-बीडकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुक पुणतांबा फाटा येथून वैजापूर-गंगापूर मार्ग -कायगाव- प्रवरासंगम -शेंडी बायपास -विळद घाट – केडगाव बायपास मार्ग वळविण्यात येणार आहे.

लोणी-बाभळेश्वर-श्रीरामपूरकडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्वर-श्रीरामपूर -टाकळीमान – नेवासा मार्गे अहमदनगरकडे वळविण्यात येणार आहे. या पर्यायी मार्गातून ऊस वाहतूक करणारे वाहने (उदा. ट्रक, ट्रक्टर व अन्य वाहने) यांना सूट देण्यात आलेली आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 225
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर शहर, घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले नवे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त एलसीबीत बदल नाही

13/08/2024

काम झाले तर रस्ता वाहतुकीला सुरू करण्याची मागणी

12/08/2024

अहमदनगर जिल्ह्यात १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, यासाठी असेल बंदी

09/08/2024
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.