Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘स्टार्टेड टू अल्फा’ ते ‘रिच फॉर फॉक्स’ पासवर्डने झाला होता ‘या’ एका दहशतवाद्याच्या फाशीचा प्रवास
गुन्हेगारी

‘स्टार्टेड टू अल्फा’ ते ‘रिच फॉर फॉक्स’ पासवर्डने झाला होता ‘या’ एका दहशतवाद्याच्या फाशीचा प्रवास

'टॉप सिक्रेट' ऑपरेशनची माहिती आली समोर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

तुझी प्रकृती खराब असल्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेत आहोत, असे कारण सांगत एका दहशतवाद्याला मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमधून बाहेर काढण्यात आले. आणि योग्य ती सुरक्षेचे सर्व प्रकारची काळजी घेत या दहशतवाद्याचा प्रवास पुण्याच्या येरवडा जेलच्या दिशेने सुरू झाला. केवळ दोन अधिकाऱ्यांशिवाय तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला याबाबत माहिती नव्हती की आपण कोणाला आणि कोठे घेऊन चाललो आहोत. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर सर्वांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी येरवडा जेलमध्ये कुख्यात दहशतवादी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतर पथकातील सर्वांना समजले की आपल्या सोबत कोणाला आणण्यात आले होते.

26/11 ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अजूनही थरकाप उडवणारा अनुभव ठरतो. या हल्यात सुमारे 170 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सामील असलेल्या अजमल कसाब याला अचानक फाशी दिल्याची घोषणा करण्यात आली. वास्तविक कसाबला स्वतःलाही याची कल्पना नव्हती की, त्याला फाशी दिली जाणार आहे. त्याला खोटे सांगून मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून बाहेर काढण्यात आले होते. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये गुप्तपणे त्याला फाशी देण्यात आली होती.

या सिक्रेट ऑपरेशनचे प्रमुख पोलिस अधिकारी प्रवीणकुमार पाटील यांनी आता हे गुपित उघड केले आहे. त्यांचा हा अनुभव सांगताना पाटील म्हणाले, “या हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब याला 4 वर्षांनंतर फासावर लटकावण्यात आले. त्यासाठी राबविलेले ऑपरेशन-एक्स अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. फाशीच्या 27 तासांआधी त्याला ऑर्थररोड जेलमधून काढले. मध्यरात्री 1 वाजता पोलिस फोर्स 150 किमीवर असलेल्या येरवडा कारागृहाच्या दिशेने निघाला. वाहनात बसलेला कसाब अन् सुरक्षा पुरविणारी यंत्रणा फाशीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती.”

पाटील म्हणाले, “कोर्टाचा निकाल व दया याचिका फेटाळल्यामुळे अतिरेकी मोहंमद अजमल अमीर कसाबची फाशी निश्चित झाली. मुंबई पोलिसांना कसाब याला फाशीसाठी मध्यवर्ती येरवडा कारागृहात तातडीने हलविण्याचा गोपनीय आदेश मिळाला होता. तत्कालीन सहपोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी ऑपरेशन एक्ससाठी माझ्यावर जबाबदारी सोपविली. तेव्हा मी परिमंडळ 12 चा उपायुक्त होतो.” निर्णय झाल्यानंतर आम्ही अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. कसाबला तुझी प्रकृती खराब असल्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेत आहोत, असे कारण सांगण्यात आले होते. तपास अधिकारी रमेश महाले यांनी संपूर्ण रस्त्यात कसाबला बोलण्यात गुंतवून ठेवलेले होते.

आदेशाप्रमाणे मध्यरात्री 1 वाजता कसाबला घेऊन फोर्स – 1 कमांडोंचा ताफा पुण्याकडे रवाना झाला. साधा वेष अन दिवे नसलेल्या तीन स्कॉर्पिओचा ताफा मुंबई-पुणे महामार्गावर होता. ताफ्याच्या दोन किमी मागे व पुढे एसआरपीची दोन प्लॅटून ठेवण्यात आल्या होत्या. शस्त्र व दारुगोळांनी युक्त कमांडो, एसआरपी जवानांनाही वाहनात कसाब असल्याचे अन् वाहन कुठे जात असल्याची माहिती नव्हती, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ” ताफ्याला अडसर नको म्हणून मार्गावरील पुणे शहर, ग्रामीण व रायगड पोलिसांना केवळ ट्रॅफिक काढण्याचीच ड्यूटी देण्यात आली होती. सुरक्षेसाठी प्रवासाचे सहा टप्पे करून ठरलेला पासवर्ड वरिष्ठांना वेळोवेळी कळवला जात होता. अधिकारी दाते सतत संपर्कात होते. सलग 3 तास प्रवासानंतर पहाटे 4 वाजता अजमल कसाब याला येरवडा कारागृहाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर 24 तासांनी अर्थात दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर 2012 रोजी अजमल याला फासावर चढवण्यात आले. ”

या ऑपरेशन साठी सहा पासवर्ड ठरले होते. त्यापैकी ‘स्टार्टेड टू अल्फा’ अर्थात ऑर्थररोड कारागृहातून रवाना हा पहिला पासवर्ड होता. येरवडाला पोहचल्यावर शेवटचा पासवर्ड ‘रिच फॉर फॉक्स’ हा अधिकारी दाते यांना पाठविण्यात आला, असे पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले, ” त्या दिवशी रात्री 8 वाजता अधिकाऱ्यांनी मला बोलावले. ‘बॅगा तयार ठेवा, दोन तासांत बोलवतो, घरीही सांगू नका,’ अशी सूचना केली होती. प्रवासात अजमल कसाब शांत होता. येरवडा कारागृहात आल्यानंतरही कमांडो ताफा अनभिज्ञ होता. प्रवासामुळे त्यांना विश्रांतीची सूचना केली गेली. तत्पूर्वी सर्वांचे मोबाइल एकत्र जमा करण्यात आले. कोणीही बाहेर पडायचे नाही, असा आदेश झाला. कसाबच्या फाशीनंतर ताफ्यातील कर्मचाऱ्यांना वाहनात कसाब होता याची माहिती झाली.”

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 131
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.