Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या बजाज शोरूममध्ये नेमकं काय घडलं? ग्राहकाच्या तक्रारीनंतर खळबळ; मॅनेजरसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरच्या बजाज शोरूममध्ये नेमकं काय घडलं? ग्राहकाच्या तक्रारीनंतर खळबळ; मॅनेजरसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

तक्रारीनुसार, त्यांच्या सासऱ्यांनी सुमारे एक वर्षापूर्वी संगमनेर येथील मालपाणी बजाज शोरूममधून बजाज कंपनीची 'चेतक' इलेक्ट्रिक दुचाकी विकत घेतली होती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून शोरूमचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एका ग्राहकाला आणि त्यांच्या ज्येष्ठ सासऱ्यांना लोखंडी रॉड, स्क्रू-ड्रायव्हर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्यासह १० ते १५ अनोळखी कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोरूमसारख्या सार्वजनिक आणि व्यावसायिक ठिकाणी ग्राहकाला झालेल्या या अमानुष मारहाणीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात स्वप्निल रोहिदास सातपुते (वय २५, रा. कासारा दुमाला, संगमनेर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी स्वप्निल हे शेती व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सासऱ्यांनी सुमारे एक वर्षापूर्वी संगमनेर येथील मालपाणी बजाज शोरूममधून बजाज कंपनीची ‘चेतक’ इलेक्ट्रिक दुचाकी विकत घेतली होती. ती गाडी बंद पडल्यामुळे स्वप्निल आणि त्यांचे सासरे त्रिंबक लक्ष्मण राऊत हे दोघे शनिवारी, ३० मे रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास सदर गाडी दुरुस्त करण्यासाठी पिकअप गाडीतून मालपाणी बजाज शोरूम येथे घेऊन आले होते.

शोरूममध्ये आल्यानंतर स्वप्निल व त्यांचे सासरे गाडी दुरुस्तीसाठी जमा करून घेऊन पावती देण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना सांगत होते. आम्हाला घाई असून बाहेर जायचे आहे, असे त्यांनी सांगितले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्धा तास थांबण्यास सांगितले. अर्धा तास झाल्यानंतर स्वप्निल यांनी पुन्हा पावतीची मागणी केली. यावरून शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड हे त्यांच्याशी मोठ्या आवाजात उद्धटपणे बोलू लागले. मॅनेजर चुकीच्या पद्धतीने बोलत असल्याचे पाहून स्वप्निल यांनी मोबाईलवर या सर्व प्रकाराचे शूटिंग काढण्यास सुरुवात केली.

मोबाईलवर शूटिंग काढत असल्याचा राग आल्यामुळे मॅनेजर सचिन पलोड प्रचंड संतापले. त्यांनी स्वप्निल व त्यांचे सासरे त्रिंबक राऊत यांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. त्याच वेळी शोरूममधील इतर १० ते १५ कर्मचारी त्या ठिकाणी धावून आले आणि त्यांनी स्वप्निल व त्यांच्या सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीदरम्यान दोन कर्मचाऱ्यांनी लोखंडी रॉड आणि स्क्रू-ड्रायव्हरचा वापर करून स्वप्निल यांच्या छातीवर, हातावर, पायावर, पोटावर आणि तोंडावर गंभीर दुखापत केली. तसेच मॅनेजर सचिन पलोड यांनी स्वप्निल यांचा गळा दाबून ‘तुला मारून टाकीन’ अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

या गंभीर मारहाणीनंतर स्वप्निल सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रात्री उशिराने मॅनेजर सचिन पलोड, मंगेश मिसाळ, विष्णू मोहरीकर, सचिन धुमाळ, धारणकर आणि इतर १० ते १२ अनोळखी शोरूम कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), १८९(२) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 3,232
मारहाण मालपाणी बजाज शोरूम संगमनेर शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.