Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ
राजकारण

महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ

चार जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, तोपर्यंत सत्तारांचं हे बंड शांत होतं की महायुतीमध्ये उभी फूट पडते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2026Updated:01/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटली असून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निर्णयाला धुडकावून लावत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यानंतर स्वतः अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे.

भाजप आमच्या पक्षात गटतट पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकंच तोडून टाकलं आहे. आमची जिल्हा परिषद गेली, महापालिकेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून असणारी सत्ताही संपली, आता आमच्याकडे राहिलं काय? अनेक छोट्या जागांवर वैयक्तिक भाजपचे नेते मोठे होत आहेत आणि शिवसेनेला संपवले जात आहे, असा उघड आरोप सत्तार यांनी केला.

शिवसेनेची शकलं झाल्याचा फायदा भाजप घेत असल्याचा आरोप करताना सत्तार यांनी एका भागाला हाताशी धरायचं आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा, अशी खेळी खेळून जर आमचा ‘मोठा भाऊ’ आम्हालाच संपवणार असेल, तर आमच्याकडे दुसरा इलाज नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची तुलना थेट पश्चिम बंगालशी करताना सत्तार म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते. नंतर त्यांच्यातील समन्वय तुटला आणि आज ते एकमेकांना मारत आहेत. महाराष्ट्रात आमची तशी ‘ममता’ होऊ नये, याची काळजी आणि दक्षता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आमचा नेता शेतकरी, दलित, मजूर आणि सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा आहे, त्यामुळे आमची ममता होणे शक्य नाही, असं देखील ते म्हणाले.

अब्दुल सत्तार यांच्या विधानावर आता भाजप काय पलटवार करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या काही तास आधी समीर सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. चार जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, तोपर्यंत सत्तारांचं हे बंड शांत होतं की महायुतीमध्ये उभी फूट पडते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 313
अंतर्गत वाद अब्दुल सत्तार आरोप घरचा आहेर टीका महायुती विधान परिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.