Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!
सामाजिक

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

नेहमीप्रमाणे या गंभीर आणि संतापजनक विषयावर डोळे झाकून गप्प न बसता, प्रशासनाने आपले कर्तव्य चोख बजावावे हीच समस्त संगमनेरकरांची भावना आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:
संगमनेर नगरपरिषदेचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदारांची मिलीभगत आता सामान्य नागरिकांच्या जीवावर उठू लागली आहे. प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील शनी मंदिरासमोर अवघ्या एक महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला दगडी रस्ता महिना उलटायच्या आतच पूर्णपणे उखडला आहे. प्रशासनाच्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे संगमनेरकर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत प्रशासकीय ढिषाळपणाचे जाहीर वाभाडे काढले आहेत. तसेच प्रशासनाला जागे करण्यासाठी थेट ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलनाचा सणसणीत इशारा दिला आहे.
रस्ता की मृत्यूचा सापळा? नागरिकांचा सवाल
शनी मंदिर परिसर हा शहरातील अत्यंत गजबजलेला भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि विद्यार्थ्यांची सतत मोठी वर्दळ असते. असे असतानाही केवळ महिनाभरापूर्वी लाखो रुपयांचा निधी खर्च करून येथे दगडी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, पहिल्या काही दिवसांतच या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, आख्खे दगडच्या दगड मोकळे होऊन रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले आहेत. हा रस्ता चालण्यायोग्य तर राहिला नाहीच, उलट वाहनधारकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी एक धोकादायक मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरून उखडलेल्या या दगडांमुळे येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. एखाद्या निष्पाप नागरिकाला गंभीर दुखापत झाल्यावर किंवा कोणाचा जीव गेल्यावरच या सुस्त प्रशासनाला जाग येणार का, असा बोचरा आणि संतप्त सवाल आता सामान्य जनता उपस्थित करत आहे.
प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आणि कंत्राटदाराचे खिसे गरम!
सर्वसामान्य नागरिक आपल्या कष्टाचा पैसा कराच्या रूपाने पालिकेकडे जमा करत असतात. मात्र, या प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची प्रशासकीय अनास्थेमुळे कशी उघडउघड उधळपट्टी सुरू आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. महिनाभरही न टिकणारा रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदाराने कामाचा दर्जा राखला की फक्त स्वतःचे आणि आपल्या हितसंबंधीयांचे खिसे भरण्याचे काम केले, असा थेट संशय आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. कंत्राटदाराने केलेल्या या कामावर पालिकेच्या संबंधित अभियंत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी देखरेख का ठेवली नाही, की त्यांचेही या निकृष्ट कामाला मूक संमती होती, असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उभे ठाकले आहेत.
कडक कारवाईची मागणी
या संदर्भात अमोल डुकरे यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या पत्रात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या निकृष्ट रस्त्याची संबंधित कंत्राटदाराच्याच खर्चाने तात्काळ आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी पहिली प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच शासकीय निधीचा अपव्यय करणाऱ्या त्या भ्रष्ट ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच या संपूर्ण कामाचे सखोल ऑडिट करून दोषी अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन
नेहमीप्रमाणे या गंभीर आणि संतापजनक विषयावर डोळे झाकून गप्प न बसता, प्रशासनाने आपले कर्तव्य चोख बजावावे हीच समस्त संगमनेरकरांची भावना आहे. मात्र, जर यावर तात्काळ आणि सकारात्मक कारवाई झाली नाही, तर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या ‘ढिम्म’ कारभाराविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरून ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन करतील आणि या आंदोलनादरम्यान होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडाला संपूर्णपणे नगरपरिषद प्रशासनच जबाबदार असेल, असा थेट इशारा देण्यात आला आहे. या पत्रासोबत उखडलेल्या रस्त्याचे थेट फोटोच पुराव्यादाखल जोडण्यात आल्यामुळे आता प्रशासनाची चांगलीच गोची झाली असून, यावर मुख्य अधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,004
अमोल डुकरे रस्ता दुर्दशा शिवसेना उद्धव ठाकरे गट संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.