महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
भारतात सध्या महापुरुषांचे विभाजन सुरू आहे. संबंध मानव जातीसाठी जात, धर्म, प्रांताच्या पुढे जाऊन ज्या महामानवांनी काम केलं त्यांना एका चौकटीत बसवू नका, असे प्रतिपादन व्याख्याते अर्शद शेख यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सभागृहात भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अब्दुल्ला हसन चौधरी, सुखदेव इल्हे, श्रीनिवास पगडाल, कारभारी देव्हारे, माजी नगरसेवक डॉ. दानिश खान, जावेद युनूस शेख, मुजाहिद पठाण, जाविद शब्बीर शेख, माजी गटविकास अधिकारी बी. डी. पारखे आदी उपस्थित होते.
शेख म्हणाले, जोपर्यंत शिक्षण माणसाला माणूस बनवत नाही तोपर्यंत आपले जीवन निरर्थक आहे. सद्यस्थितीत साजरा होणाऱ्या जयंत्या महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या नसाव्यात तर त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा घेणारी असावी. भविष्य हे शिक्षणाने लिहिले जाते म्हणून सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टीने आपला बौद्धिक स्तर उंचविण्यासाठी शिक्षणाची आज नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. यावर्षीही कादिर अब्बास शेख यांना मौलाना आझाद आदर्श समाज रत्न पुरस्कार, इरफान अस्लम शेख यांना स्वर्गीय मिर्झा खालिद बेग आदर्श समाज रत्न पुरस्कार, शौकत पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श आझाद पत्रकार पुरस्कार, सुरेंद्र उर्फ नाना गुजराथी यांना राज्यस्तरीय आजाद नाट्यरत्न पुरस्काराने शेख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर पत्रकारिता अभ्यास क्रमातील यशाबद्दल अनुराधा आहेर व अरविंद गाडेकर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी, एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे आसिफ शेख, सादिक तांबोळी, मिर्झा आयाज बेग, हुसेन शेख, अनिल भोसले, राम सिमरे, ज्ञानेश्वर राक्षे, इरफान फिटर, जानकीराम भडकवाड, शहनाज बागवान, शंकर गायकवाड, शेख जमीर, एजाज बिल्डर, आफताफ नाईकवाडी, शारुख शेख, जाकीर पेंटर, नजीर पठाण, शहानु बेगमपुरे, श्रीमती बानोबी शेख, विनोद गायकवाड, अफसर तांबोळी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख तर सूत्रसंचालन अनिल भोसले यांनी केले.

