Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर-अकोल्यातील ते परमिट रूम कायमचे बंद करण्यासाठी दारूबंदी समितीची राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक
आंदोलन

संगमनेर-अकोल्यातील ते परमिट रूम कायमचे बंद करण्यासाठी दारूबंदी समितीची राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक

बनावट दारू पकडून सील झालेले ते बार पुन्हा सुरू; संतापलेल्या कार्यकर्त्यांनी काढला मोर्चा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी रायतेवाडीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना आढळून आला होता. राज्यात प्रतिबंधित असलेली दारू नामांकित कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून त्याचे वितरण केले जात असल्याचे समोर आल्यानंतर संगमनेर आणि अकोल्यातील परमिट रूमवर कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सील केलेले हे परमिट रूम पुन्हा चालू झाल्याने दारूबंदी समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

रायतेवाडी येथील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून एका घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेले गोवा आणि दमण येथील दारू आढळून आली होती. घरगुती पद्धतीने नामांकित कंपन्यांच्या बॉटलमध्ये या दारूचे रिफिलिंग केले जात होते. याप्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी एकाच्या परमिट रूममध्ये या दारूची संगमनेर आणि अकोल्यात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. बनावट दारूमुळे अनेकांचे प्राण जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकांना दुर्धर आजार झाले. मात्र या व्यवसायातून संगमनेर शहरातील सुरभी बारचे मालक मालामाल झाले. त्यांच्याच माध्यमातून संगमनेर अकोल्यात या दारूची विक्री होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली होती.

आरोपींना न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाई विरोधात दुकान मालकांनी वरिष्ठांकडे दाद मागितली. त्यांच्यावर झालेल्या दंडात्मक कारवाईनंतर ही दुकाने पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतापलेल्या दारूबंदी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी तालुक्यातील घुलेवाडी येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

बनावट दारू निर्मिती करणे, तिची विक्री करणे याप्रकरणी पकडलेल्या आरोपी आणि त्यांच्या अधिकृत परवाना कक्षावर कारवाई करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली. समितीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब हासे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी जर कारवाई केले नाही तर आम्ही सदर दुकाने बंद करू. यावेळी दलित पॅंथरचे सोमनाथ भालेराव, गोविंद नागरे, शहराध्यक्ष संभव लोढा, रंगनाथ फटांगरे, सचिन साळवे, राजू सातपुते, योगेश खेमनर, लखन सोन्नर, फैसल सय्यद, आशा केदारी संगीता गायकवाड आदींची भाषणे झाली.

परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे

संबंधितांचे परवाने रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत. मात्र येथील अधिकारी त्यांच्या कामात कसूर करत असून आरोपींना सहकार्य करत आहेत. संगमनेर अकोल्यातील हे दोन्ही बार सील करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करतानाच नगर येथील अधीक्षक कार्यालय आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयावर मोर्चा देखील काढू. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांची असेल.

अमर कतारी, जिल्हाध्यक्ष ग्रामीण दारूबंदी समिती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 143
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.