Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यपाल कोश्यारींना कार्यमुक्त करण्यासाठी संगमनेर राष्ट्रवादीची सह्यांची मोहीम
आंदोलन

राज्यपाल कोश्यारींना कार्यमुक्त करण्यासाठी संगमनेर राष्ट्रवादीची सह्यांची मोहीम

संगमनेर बस स्थानक चौकात भल्या मोठ्या फ्लेक्सवर घेतल्या जाताहेत सह्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने तातडीने कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी शुक्रवारी संगमनेर शहर व तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सह्यांची मोहीम उघडली आहे. बस स्थानक चौकात एका भल्या मोठ्या फ्लेक्स बोर्डवर ही सह्यांची मोहीम सुरू आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महापुरुषांविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य करत आहे. राज्य त्यांच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असताना केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. राज्यातील सत्ताधारी देखील त्यांची पाठराखण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. विरोधी पक्षाने देखील त्यांना केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा उद्रेक होईल अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाला विरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांना तातडीने परत बोलावून कार्यमुक्त करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी संगमनेरकरांचा या मोहिमेला मोठा पाठिंबा मिळाला. बस स्थानक चौकातील फ्लेक्सवर संगमनेरकर नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आदींनी सह्या करण्यासाठी गर्दी केली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहूल वर्पे, मनिष माळवे, किरण घोटेकर, अमोल राऊत, गजानन भोसले, अशोक काळे, नितीन आहिरे, प्रसाद काठे, केवल आव्हाड आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 109
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.