Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » समृद्धी जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग; मंत्री विखे पाटील
विकास

समृद्धी जनतेच्या मनाला जोडणारा विकासाचा महामार्ग; मंत्री विखे पाटील

समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याच्या शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रक्षेपणास नागरिकांचा प्रतिसाद
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नागपूरच्या मुख्य सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंज येथे थेट दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले. नागरिकांचा या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनाला जोडणारा हा विकासाचा महामार्ग असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सिमा हिरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१६ मध्ये मुख्यमंत्री असतांना समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि प्रत्यक्ष कामाला त्यांच्या काळात सुरुवात झाली. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते विकास विभागाचे मंत्री होते. या उभयतांनी समृध्दी उभारणीसाठी कष्ट घेतले. विक्रमी अशा कमी वेळेत भूसंपादन केले. मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा हा महामार्ग चार विभागांतील १० जिल्ह्यांमधून जात असल्याने त्या भागातील विकासाला मोठी गती मिळणार आहे.

शेती विकासाला हा मार्ग उपयुक्त ठरणार असून, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशमधील शेतकरी आपला उत्पादित माल थेट मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेवू शकणार आहेत. कृषी मालाची निर्यात होणार असल्याने औद्योगिकीकरणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार लोखंडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे‌. समृद्धी महाराष्ट्राबरोबर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा ठरणारा प्रकल्प आहे.

खासदार डॉ. विखे म्हणाले, समृध्दी महामार्गाला जोडूनच सुरत-हैद्राबाद हा ग्रीन फिल्ड महामार्ग जात आहे‌. नगर-मनमाड महामार्गाचे काम जानेवारी २०२३ पासून सुरू होत आहे‌. त्यामुळे नगर जिल्ह्याला गतिशिल रस्त्यांचे जाळे उभे राहून विकासाला चालना मिळेल.

प्रास्ताविक महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपुते यांनी केले. कार्यक्रमानंतर लगेचच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून एक हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध दिव्यांग साधनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 201
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.