Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नवे गाव कारभारी; असे आहे जिल्ह्यातील सरपंचपदाचे पक्षीय बलाबल
राजकारण

नवे गाव कारभारी; असे आहे जिल्ह्यातील सरपंचपदाचे पक्षीय बलाबल

जिल्ह्यात सर्वात मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यापाठोपाठ भाजप, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतचे निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. यात सर्वाधिक 127 ग्रामपंचायतीची सरपंचपदे महाविकास आघाडीला मिळाली आहेत. उर्वरित 76 पैकी 59 सरपंचपदे भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातील सर्वाधिक 83 जागा मिळविणारा मोठा पक्ष ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजप दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानी 28 जागांवर काँग्रेस असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 16 जागांवर यश मिळाले आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती व बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी प्रत्येकी एकेका ग्रामपंचायत सरपंचपद मिळवीत ग्रामीण राजकारणात खाते उघडले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पारनेर तालुक्यात एका ग्रामपंचायतीमध्ये, तर वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला पाथर्डी तालुक्यात प्रत्येकी एकेका ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद मिळाले आहे. याशिवाय श्रीरामपूरला माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाला दोन आणि मुरकुटे व ससाणे गटाला एक, नेवाशात गडाख-घुले गटाला एक, शेवगाव मध्ये जनशक्ती मंचला एका जागेवर सरपंचपद मिळाले. राहुरीला विखे-तनपुरे गटाला एका जागी सरपंचपद मिळाले. आठ ठिकाणी अपक्षांनी सरपंचपदे पक्षीय नेत्यांच्या समर्थकांना बाजूला सारत खेचून आणली.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसने एकत्रित सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वन असल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. यावेळी जनतेतून सरपंच निवडायचा असल्याने या पदासाठी चुरस होती. या पार्श्‍वभूमीवर, जिल्ह्यात 203 ग्रामपंचायतींपैकी 83 ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच विराजमान झाल्याची माहिती फाळके यांनी दिली.

असे आहे सरपंचांचे तालुकानिहाय पक्षीय बलाबल

अकोले : अकरा सरपंचांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि भाजप 1.

संगमनेर : 37 सरपंचांपैकी 26 काँग्रेस 9 भाजप आणि 2 अपक्ष.

कोपरगाव : 26 सरपंचांपैकी 15 राष्ट्रवादी काँग्रेस, 9 भाजप, 1 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि 1 अपक्ष.

श्रीरामपूर : 6 सरपंचांपैकी 2 राष्ट्रवादी काँग्रेस, 2 मुरकुटे गट, 1 मुरकुटे आणि ससाने गट, आणि 1 अपक्ष.

राहाता : 12 सरपंचांपैकी 11 भाजप, 1 राष्ट्रवादी काँग्रेस.

नेवासे : 13 सरपंचांपैकी 12 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-गडाख गट), 1 गडाख आणि घुले गट.

शेवगाव : 12 सरपंचांपैकी 8 राष्ट्रवादी काँग्रेस 3 भाजप आणि 1 जनशक्ती.

अहमदनगर : 27 सरपंचांपैकी 12 राष्ट्रवादी काँग्रेस, 14 भाजप आणि 1 अपक्ष.

पारनेर 16 सरपंचांपैकी 13 राष्ट्रवादी काँग्रेस, 2 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 1 बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट).

श्रीगोंदा : 10 सरपंचांपैकी 6 राष्ट्रवादी काँग्रेस, 1 काँग्रेस, 3 अपक्ष.

कर्जत : 8 सरपंचांपैकी 5 भाजप, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).

जामखेड : 3 सरपंचांपैकी 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 भाजप.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 115
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.