Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिव्यांग विद्यार्थ्यांचे नैपुण्य कौतुकास्पद : सत्यजित तांबे
क्रिडा व कला

दिव्यांग विद्यार्थ्यांचे नैपुण्य कौतुकास्पद : सत्यजित तांबे

संगमनेरमध्ये क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत 650 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

दिव्यांग विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी असून त्यांच्यामधील कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी संग्राम निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून या विद्यार्थ्यांमधील नैपुण्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.

जिल्हा समाज कल्याण कार्यालय व संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय आणि डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संगमनेरमध्ये संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंध मतिमंद मूकबधिर अस्थिव्यंग प्रवर्गाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. यावेळी तांबे बोलत होते. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, सहाय्यक लेखाधिकारी गांगुर्डे, चव्हाण, सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, हिरालाल पगडाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, सेक्रेटरी डॉ. नामदेव गुंजाळ, सूर्यकांत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

सत्यजित तांबे म्हणाले, राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम मतिमंद विद्यालयाच्या माध्यमातून या विशेष विद्यार्थ्यांसाठी चांगली सेवा दिली जात आहे. संग्राम हे गुणवत्तेने राज्यभरातील नावाजलेले विद्यालय आहे. यातील विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी काम करणे हे खरे ईश्वराचे काम आहे. या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात दाखवलेली नैपुण्य हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, संग्रामच्या माध्यमातून जिल्हाभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या ठिकाणी कला व क्रीडा मधून आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेतील विद्यार्थी राज्य पातळीवर नक्कीच जिल्ह्याचे नाव मोठे करतील.

या विद्यार्थ्यांच्या यशस्वी क्रीडा स्पर्धा स्पर्धांच्या आयोजनामध्ये मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, सुनील कवडे आदींसह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

25 शाळेतील 650 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागीत आपले नैपुण्य दाखवून दिले. क्रीडा स्पर्धेत रनिंग, ॲथलेटिक्स, कबड्डी, खो-खो अशा विविध स्पर्धा पार पडल्या. तर सांस्कृतिक स्पर्धांमधूनही या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत देशातील विविधतेतून एकतेचे दर्शन घडविले. यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच या विद्यार्थ्यांची संगमनेर शहरातून भव्य रॅली ही संपन्न झाली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 110
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.