Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन
क्रिडा व कला

संगमनेरात ‘बोलक्या बाहुल्यां’ना बालचमूंचा प्रतिसाद; डिसेंबरमध्ये रंगणार राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यातून ज्ञान, रंजन आणि प्रबोधनासोबतच मुलांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा संगमनेरच्या वतीने आयोजित ‘बोलक्या बाहुल्या’ या पपेट शो कार्यक्रमास पालक आणि बालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
सह्याद्री कॉलेजमधील के.बी. दादा देशमुख सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात पपेट शो कलाकार संगीता पुंडगे यांनी आपल्या बाहुल्यांच्या माध्यमातून नागपंचमी, होळी, अफजलखान वधाचा ऐतिहासिक प्रसंग, लावणी, हिंदी गीते आणि देशभक्तीपर गीतांची जोड देऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मनोरंजन आणि प्रबोधनाचा हा अनोखा मिलाफ बालकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला.
या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे, डॉ. विवेक वाकचौरे, अरविंद गाडेकर, प्रा. अरुण लेले, दर्शन जोशी, शशांक गंधे, प्रकाश पारखे, प्रा. आसावरी रत्नपारखी, सुप्रिया गवांदे, नंदाताई मेंद्रे, अनघा खेडकर, प्रा. जितेंद्र पाटील, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गोंटे आणि राजेंद्र खोसे आदि मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनात दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यातून ज्ञान, रंजन आणि प्रबोधनासोबतच मुलांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये सातत्याने बालकांसाठी दर्जेदार उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी आगामी डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आणि संगमनेरकर नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
संस्थेची नवीन सदस्य नोंदणी सध्या सुरू असून इच्छुकांनी ८९८३७७१२५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपली नोंदणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लवकरच होणाऱ्या कथाकथन कार्यशाळेत कथा कशी निवडावी आणि ती कशी सादर करावी, याचे मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पपेट शो कलाकार संगीता पुंडगे यांच्यासह कथाकथनकार शांताराम डोंगरे, सौरभ म्हाळस, डॅनियल खरात तसेच काशेश्वर विद्यालय, कासारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोखरी हवेली आणि न. सो. कळसकर शाळेच्या मुख्याध्यापकांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुविधा आरसिद्ध यांनी केले तर दर्शन जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले असून, मोठ्या संख्येने रसिक श्रोते, पालक व विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 499
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था बोलक्या बाहुल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये आंतरराष्ट्रीय आकाराच्या फुटबॉल मैदानाचे थाटात उद्घाटन; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

22/06/2026

पंतप्रधानांच्या ‘व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेत संगमनेरच्या आनंद गायकवाड यांचे यश; ७५ उत्कृष्ट कलाकारांमध्ये निवड

22/04/2026

कथाकथनाचे तंत्र शिकण्याची संधी; संगमनेरात १० मे रोजी रंगणार विशेष कार्यशाळा, बालकुमार साहित्य संस्थेचा स्तुत्य उपक्रम

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  कोपरगाव- अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आपला बडगा उगारला…

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.