Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यातील बहुचर्चित दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल अखेर लागला… एका आरोपीस जन्मठेप तर उर्वरित तेरा जणांची निर्दोष मुक्तता
न्यायालय

जिल्ह्यातील बहुचर्चित दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल अखेर लागला… एका आरोपीस जन्मठेप तर उर्वरित तेरा जणांची निर्दोष मुक्तता

श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालय निकाल; राजकीय वर्चस्वातून झाली होती हत्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/12/2022Updated:28/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर : पोस्टर फाडण्याचा राग मनात धरून राजकीय वर्चस्व वादातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघा तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर उर्वरित 13 आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची साडेचार वर्षांपूर्वी २८ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळच्या वेळी बीड रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या दुहेरी हत्याकांड प्रकरणी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी तपास करत गोविंद दत्तात्रय गायकवाड, विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काका बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव व धनाजी धनराज जाधव या 14 जणांविरोधात श्रीगोंदा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

खटल्याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाकडून विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. एन. शुक्ला यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात सरकार पक्षाने प्रत्यक्षदर्शी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह बत्तीस साक्षीदारांची तपासणी केली. तर बचाव पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी न्यायाधीश जी. एन. शुक्ला यांनी खटल्याचा निकाल जाहीर केला.

मुख्य आरोपी स्वामी उर्फ गोविंद दत्तात्रेय गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काकासाहेब बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमरिया रविश, अशोक जाधव, पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिनंदन जाधव व धनाजी धनराज जाधव या तेरा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 124
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.