Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात पार पडल्या अटल वकृत्व स्पर्धा; ५५ स्पर्धकांचा सहभाग
सामाजिक

संगमनेरात पार पडल्या अटल वकृत्व स्पर्धा; ५५ स्पर्धकांचा सहभाग

मृणाल तुपे, अमेय पाटील, वैष्णवी भोईर व रुचिका गोसावी ठरले विजेते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : उत्तर नगर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने “अटल डिबेटिंग क्लब” अंतर्गत संगमनेर मध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या अटल वकृत्व स्पर्धेत ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १२ जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय अटल वकृत्व स्पर्धेसाठी विजेत्यांमधून स्पर्धक निवडले गेले.

भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत राज्यभरात “अटल युवा पर्व”चे आयोजना अंतर्गत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची लोकांशी संवाद साधण्याची कला आणि अतुलनीय वक्तृत्व हे राष्ट्र व युवकांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा वारसा जपण्यासाठी व वक्तृत्वाची कला अंगी असणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने भारतीय जनता युवा मोर्चामार्फत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संगम सेवाभावी संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयात संगम सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराज डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. रवींद्र चांडक यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू, भाजपा जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, तालुकाध्यक्ष सतीश कानवडे यावेळी उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये ५५ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया सुशासनावर भर देतो’, ‘भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे’, ‘फुकटच्या राजकारणातून विकासाच्या राजकारणाकडे जाणे काळाची गरज’, ‘नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे युवकांच्या सक्षमीकरणावर लक्ष आहे’ आणि ‘अमृत काल येणारा भारत व युवकांचे योगदान’ ह्या विषयांवर स्पर्धकांनी आपली मते मांडली. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर, श्रीराज डेरे युवा मंच व मृत्युंजय विद्यार्थी शाशित संघ यांनी परिश्रम घेतले.

यावेळी मान्यवरांसमवेत युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. ऋषिकेश खर्डे, जिल्हा कोषाध्यक्ष केशव दवंगे, उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, शुभम लहामगे, जिल्हा सचिव किरण गुंजाळ, दत्तात्रय दिघे, भाजपा कार्यालय प्रमुख विकास गुळवे, सुनील घुले, हरीश वलवे, जगन्नाथ शिंदे, आयुर्वेद महाविद्यालयचे प्राध्यापक डॉ. गौरव महाले, डॉ. मनीषा वाळुंज, डॉ. पायल गायकवाड, डॉ. स्नेहल इंदानी यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद थोडसरे व वैभवी कुमावत यांनी केले.

स्पर्धेत हे ठरले विजेते

स्पर्धेमध्ये मृणाल तुपे हिने प्रथम, अमेय पाटील यांनी द्वितीय तर वैष्णवी भोईर आणि रुचिका गोसावी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख रकमेचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देत त्यांचा सन्मान करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 105
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.